तो आणि ती (भाग 2)

तो आणि ती (भाग 2)

 तो आणि ती (भाग 2)


त्यांच्या सोपवलेल्या वस्तू मी आज पाहिल्या त्यात एक रबराचं कड, एक मोठा रुमाल, एक अंगठी, काही पेपर, फोटो आणि एक वही होती. वहीत बऱ्यापैकी त्यांच्या दोघांच्या एकत्रित आठवणी नमूद केलेल्या होत्या. प्रत्येक गोष्टीची एक वेगळी कहाणी होती. त्यांच्या प्रेमाचा प्रवास प्रत्यक्षात एकदा वाटेत चालतांनाच सुरु झालेला तिने सहजच त्याला विचारले की माझ्याबद्दल तुझा काय विचार आहे त्यावर तो लगेच म्हणाला होता की तू छान आहेस मला आवडते रात्री त्यानं तिचं मत जाणून घेतलं तिचंही सारखंच होत. दोघांच्या नकळत प्रवास सुरु झाला. महत्वाचे असे की तो थोडा आक्रमक व ती थोडी सावध अशा स्वभावाची संतुलन खूप बेस जमलं होतं तो काही गोष्टींचा एकदम ठाम होता त्यामुळे बरेचदा तिला काही थंड खावंसं वाटलं की तिला विचारूनच खावं लागे. मजेशीर म्हणजे उपलब्ध दस्तावेज एक गोष्ट प्रखरपणे सांगतात की त्या काळात ते आपला जास्तीत जास्त वेळ एकमेकांना देत असत. ती नेहमी आपलं घर आई वडील ह्या गोष्टी त्याला सांगत असे आणि तो अगदी या विरोधी त्याला घरदारात मजाच नव्हती. प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी ते एकमेकांचा सल्ला घेत असतं त्यावर चर्चा करत असतं त्याचा आक्रमक स्वभाव तिला प्रचंड आवडत असे मात्र त्यावर ती त्याला कधी कधी बोलूनही दाखवत असे. एक वर्षांपूर्वी मार्च महिन्यात तो मला सोडून कुठेतरी गेला आणि तिलाही मी परत पाहीले नाही मला आजही हाच प्रश्न पडतोय त्यानें हे काम लिहण्याचं माझ्यावर का सोपवले असावे. त्याच्या परतण्याची चिन्हे नाहीत मात्र मी तिला पुन्हा शोधून काढू शकतो तिला जगण्यासाठी प्रेरित करू शकतो आवडत्या गोष्टी कधीच सोडायच्या नाहीत असे ती म्हणतं असे तिला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी तिने सोडून दिलेली आहे असे तो म्हणाला तिला तिचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांचा हा सर्व खटाटोप तर नसावा ना ? त्यांच्यात सर्व प्रकारचे संभाषण होत असे अगदी सर्व स्तरांचे भयानक होते यार दोघ एक प्रसंग खूप छान होता त्यांना प्रवासाची आवड खूप अगदी न चुकता आठवड्यातून दोन दिवस ते फिरत असतं कधी अभ्यासासाठी कधी असंच टाईमपास प्रवासात ते एकमेकांच्या सहवासात खूप गोष्टी शिकले. त्याला लिखाणाची खूप आवड होती अगदी पहिल्यापासून मात्र मला तर काही तरी नविनच मिळाले भाई अपना दोस्त तो कवि निकला ना तिच्या आठवणींच्या अनेक कविता त्यानें लिहलेल्या मला भेटल्या अगदी तिचं हुबेहूब वर्णन करणाऱ्या. अष्टपैलू व्यक्तिमत्व निघाला साला ते दोघ काम करतांना खूप मस्ती करत असतं अगदी इतकी इतरांना कळतही नसे. मला यापुढे शोधण्याचा प्रयत्न करू नकोस मात्र तिला शक्य तितकी मदत कर अगदी मी करायचो तसा त्याच्या वहितील माझ्यासाठीच शेवटच्या पानांवरील शेवटचा संदेश होता तो. हे सर्व वारंवार पाहिल्यावर मी वर्षांपासून तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला अगदी त्याच्याप्रमाणे तिच्या नकळत तिच्याशी बोललोही मात्र माझ्या हाती काही खास लागले नाही. आता इतका प्रयत्न करूनही मला काही न मिळाल्याने मी खूप हताश होतो. पुढे त्याने सोपवलेल्या वस्तू फोटो कागदे सर्वच गोष्टी एकत्रित नजरेसमोर ठेऊन त्यावर माझे संशोधन सुरू झाले. एक दिवस त्याच्या घरी गेलो मला गरज होती त्यांच्या फेसबुक आणि व्हाट्सऍप अकाउंट बद्दल माहिती घेण्याची नवलच झाले त्यांचा नंबर पोस्टपेड होता कार्ड वर्षभराने चालूच होते. विशेष म्हणजे त्याच्या घरातील लोकांनी त्याची प्रत्येक गोष्ट तशीच सांभाळून ठेवली होती माझे काम खूप सोपे होणार होते मी त्याच्या घरातल्यानं सर्व कल्पना दिली त्याचे आईवडील मला आपल्या मुलांप्रमाणेच वागवतात म्हणून जास्त काही झाले नाही आणि मला आता सर्व गोष्टी अगदी मनसोक्त अभ्यासात येणार होत्या. तिच्या भावविश्वात रमलेला तो जाण्यापूर्वी घाईत अनेक गोष्टी मागे ठेवून गेला होता त्या मला त्याच्या घरी मिळाल्या अगदी दोंघांचे फोटो सर्व मेसेज कॉल रेकॉर्डिंग अगदी सर्वच माझे काम सोपे तर झाले मात्र आता मी त्यांच्या प्रेमात गुतत जात होतो अगदी जाणूनबुजून. वर्षभराने मी त्या घरी गेलो होतो आणि मी तिकडे जिवंत झालो होतो त्याच्या आठवणीत साल्याचं खूप प्रेम होत तिच्यावर. नसेन मी नसेन तू जिवंत जीत पाहण्या मरून जिंकलो कसे बघायचेच एकदा त्याला जिंकायचं होत आणि त्यानं तेच केलं तो नसतांनाही जिंकून गेला सर्वच...


तो आणि ती (भाग 2)

संकलन- अविनाश पाटील

0 Comments: