तो आणि ती (भाग 3)

तो आणि ती (भाग 3)

  तो आणि ती (भाग 3)


त्याच्या घरच्यांशी सवांद साधल्यावर आश्चर्याचे धक्के बसायला सुरवात झाली त्याच्या घरी तिच्याबद्दल त्याने बरींच माहिती दिली होती उलट ह्या कामात त्यांनी मला खूप मदत केली. मजेशीर बाब अशी होती की हा भाऊ तिचा मेसेज किंवा कॉल आला नाही तर रात्रभर झोपत नसे. कहाणीत स्पष्टता आणतो दोघ सहा महिन्यांच्या ओळखीतून एकमेकांच्या प्रेमात पडले होते पुढील सहा सात महिने एकत्रित होते त्यानंतर जवळजवळ नऊ महिने यांचं संभाषण बंद त्यानंतर तो वर्षभरापूर्वी गेला. त्याने काही अंक किंवा तारखा अनेक वेळा रेखाटल्या आहेत वहीत व इतर ठिकाणी त्यात १, ३, ९, १०, ११, २१ यांचा समावेश आहे त्याला यातून बरेच काही तरी सांगायचे होते या प्रत्येक अंकामागे एक कहाणी दडली होती प्रत्येकाची उत्तरे मला त्याच्या फेसबुक व व्हाट्सअप वरून मिळाली. ह्या सर्व तारखा होत्या त्यांच्या दोघांच्या काही विशेष आठवणींच्या. त्याचं कामाचं स्वरूप भविष्य अगदी ठाम होतं आणि तिलाही तो नेहमी तसंच सांगत असे दोघांचे इतक्या जवळून निरीक्षण केल्यावर मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होत मग चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना नेमकं काय घडलं असावं? तिचं विश्व त्याच्या तुलनेत लहान होतं आपलं घर आईवडील आपला अभ्यास बस इतकंच आणि तो जिंदगी ना मिलेगी दोबारा या उक्तीला जागणारा. गेल्या अनेक दिवसांपासून मी तिला टाळतोय रात्री झोपण्याचा प्रयत्न करतोय पण होतंच नाही त्याच्या वहितील ह्या काही मोजक्या शेवटच्या ओळी. वही, मोबाईल, २-४ वस्तू आणि काही फोटो यावरून मी खरंतर हे सर्व मांडतोय मात्र ही कहाणी पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात दोघांपैकी एक माझ्याजवळ असणे गरजेचे होते. त्याला एखाद्या गोष्टीचा लवकर राग आला तर तिला तो निवारता येत असे त्याला अनेक प्रसंगी शांत करण्यात तिचा मोठा वाटा दिसून येतो मात्र यांचा गैरफायदा तिने कधी घेतला नाही. दोघांनी आपल्या प्रेमाचा कधी गाजावाजा केला नाही अगदी कधीच नाही. माझ्याकडे दिलेल्या वस्तूंपैकी एक रबराचं कड त्याने तिच्या हातांतून काढून घेतलं होतं तर रुमालही त्याने ठेऊन घेतला होता. त्यांचे मेसेज वाचले ती वही वाचली तेव्हा अंगावर काटे उभारले काय थक्क करणारी कहाणी होती यार. माझ्यासमोर दोघांसाठी अनेक प्रश्न तयार होते मात्र उत्तरे देण्यास कोणीही समोर नव्हते तो तर गायबच होता आणि तिची आणि माझी इतकीही ओळख नव्हती की मी तिला हे सर्व इतक्या स्पष्टतेने विचारू शकेल. तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या असंच काहीसं माझ्यासोबत चालू होतं त्यानं सोपवलेलं काम आणि तेही तिला सांभाळण्याची जबाबदारी देऊन. टोचून बोलण्याची त्याची कला तिला खूप आवडतं असे ती लवकरच त्याच्याकडून हे शिकली होती छोट्या छोट्या गोष्टीकडे त्याचं बारकाईने लक्ष असायचे आणि तिचं तितकंच दुर्लक्ष. दोघांच्या अनेक गोष्टी सारख्या असल्या तरी अनेक बाबतीत त्यांचे मत वेगळही असायचे यावरून अनेकदा वाद होत असत मग दोघंही रुसून बसत आणि संवाद मूक मोर्चासारखा फोनवरून चाले. कट्टी बट्टीचा त्यांचा खेळ क्षणिकच असे. कितीही काही केलं तरी त्यांच्या प्रेमाची हि कहाणी दोघांपैकी एकाने समोर आल्याशिवाय पूर्ण होणार नव्हती आणि तो डोळ्यासमोर दिसतं नाही आणि ती दिसतें पण मी काही करू शकत नाही असं काहीसं झालं होतं आणि शेवटी मी आर या पार चे धोरण स्वीकारले आणि त्याच्या मनाप्रमाणे तिला काहिही न विचारण्याचा निर्णय पक्का केला. त्याच्या एका फोटोत खूप छान काहीतरी आढळले त्यात कदाचित त्यांचं भविष्य त्यांनी रेखाटलं असावं घर, परिवार, काही प्राणी, पक्षी अगदी सर्वच होतं त्यात. तिच्या आठवणीत तो बरेचं दिवस जगला दगडासारखा आणि नंतर तिलाचं आठवणी देऊन गेला. त्याच्या आयुष्यातील ती मी बऱ्यापैकी ओळखली होती आता तिच्या आयुष्यातील तो ओळखण्याची गरज होती...

तो आणि ती (भाग 3)

संकलन- अविनाश पाटील

0 Comments: