तो आणि ती... (भाग १)
त्यांची भेट अगदी दोन वर्षांपूर्वी झाली तो मला सांगत होता यापुर्वी इतका अस्वथ मी त्याला कधीच पाहिले नाही आपल्याच वेगळ्या जगात वावरणारा तो मर्यादा आणि समस्यांना भिडतं त्याचा आजवरचा प्रवास मीही अगदी जवळून अनुभवलेला. थोडासा रागट, जास्त न बोलणारा, लवकर कोणाशी मैत्री न करणारा, खेळणं आणि वाचन यातच गुरफटणारा, प्रत्येक गोष्ट धाडसाने करणारा असा तो. तशीच काहीशी तोंडओळख तिचीही त्याने मला करून दिलेली शांत, गोरी गार, हुशार, नाटकाची आवड असणारी आणि बरीचशी भावनिक. मला आज त्याने अचानक बोलावून घेतले अगदी रात्री मी दुःखाचा महाकवी ग्रेस वाचला होता पण तो बोलायला लागला आणि मी शांतपणे ऐकू लागलो अगदी मन लावून तो आपल्या निरागस प्रेमाची कहाणी मांडू लागला तो तिला दोन वर्षांपूर्वी भेटला पहिल्याच भेटीत काहीतरी वेगळं घडलं यापूर्वी त्याने कधी न केलेल्या किंवा तो भीत असलेल्या गोष्टीला तो तिच्यामुळे समर्थपणे सामोरे गेला माहित नाही कसा पण ते त्यानें शक्य करून दाखवले. दुसऱ्या भेटीत ते बोलू लागले हळूहळू एकमेकांना समजू लागले पुढे मनमोकळे एकमेकांसमोर सर्वच व्यक्त करू लागले त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले यापूर्वी मुलगी आपल्या आयुष्यात असावी असा विचारही त्यांच्या मनातही नाही कारण त्याला आपल्या जिद्दीला प्रत्येक क्षणी तपासून एका निश्चित मार्गाने काम करायचे होते आणि यांची वारंवार कल्पना त्याने मला दिलेली. तिला पाहिले की काहीतरी वेगळं होत तो म्हणाला यापुढे काय त्यानंतर तो बोलला मी प्रेमात आहे मी विचारले कसे? तो उत्तरला वेळेबरोबर संवाद वाढला चर्चा वाढली यांतून एकमेकांविषयी विश्वासाचे नातं तयार होऊ लागले आणि दोघांच्या होकाराने मैत्रीचे नाते प्रेमात पालटले. जगाला जिंकायला निघालेला तो त्यांचे प्रेम जिंकला अगदी खरेखुरे. फोनवर मेसेज करणं वारंवार बोलतं बसणं त्यांच्या वागण्या बोलण्यातील बदल मागे मलाही जाणवत होते मी त्याला अनेकदा विचारणे टाळले पुढे काय माझा प्रश्न तयारच तिची काळजी वाटते नेहमी तिचा विचार येतो कामात मन लागत नाही ती आता सर्वस्व झाली हे त्यांच्या मनाने कायमचं स्वीकारले होते. हि संपूर्ण कहाणी आतापर्यंत त्याचीच होती तिचं मत काय प्रश्नांची सरबत्ती चालूच होती तिचंही अगदी सारखंच होतं तिला माझ्यापेक्षा इतरांना तिचा वेळ द्यायचाच नव्हता माझ्याबरोबर तिला सुरक्षित आणि हक्काचं कोणीतरी नेहमीच सोबत आहे असं वाटायचं माझं तिच्यावर कमी आणि तिचं माझ्यावर जास्त असं होतं. त्यांनी एकमेकांना चिडवण्यासाठी अनेक नावेही ठेवली होती भविष्याची स्वप्ने आणि त्यांचा संपूर्ण प्रवास तो हुबेहूब मांडत होता कारणं तो माझ्याशी कधीच खोटं बोलतं नसे. मला आज भारी वाटतं होतं मी त्याच्यासाठी खूप आनंदी होतो. भूतकाळातील सर्व गोष्टीना बाजूला सारत आमच्यात बरंच काही घडलं अगदी एकमेकांना न दुखावता पण आता तो थोडा नरमला आणि बोलू लागला सरणावर पोहचलोय मी मोठा हादरा बसला मला आज आम्ही बोलत नाही एकमेकांना टाळतो. त्याचे शब्द वेदना देऊ लागले पुढे काय तो म्हणाला काही कळलंच नाही कधी काय कुठे कसं सर्व अगदी अचानक. सलाम मेरे प्यारे भाइयों और बेहनों पाडगावकर आठवले अचानक अशी स्थिती मी पहिल्यांदाच पाहिली. आजकल आरश्यात बघायची भीती वाटते मीच काही चुकलो कमी पडलो असचं वाटतं प्रत्येक गोष्ट हरलोय जगण्यातील आनंद हरवलोय शहाणपन विसरलोय. तू काही बोलला यावर तिच्याशी माझा प्रश्न तो लगेच म्हणाला तीला टाळणं नाकारणं मला जमलंच नाही म्हणजे तिला हे मान्य आहे का स्पष्टता तर तिलाही नाही समोरून तर तीही काही बोलली नाही आणि बोलणारही तो धडाडला अगदी आत्मविश्वासने न डगमगता आमचं प्रेम आहे आणि उद्याही राहणार. आता मी जास्तच गोंधळात हा माझी मजा घेतोय का तर नाही मग नेमकं काय ती माझ्याशी आज बोलत नाही आणि मीही तिला टाळतो तिला तिचा वेळ देणं गरजेचं आहे वाटलंच काही तर येईल परत अगदी पहिल्यासारखी. मग तुला आता काय हवं आहे मला कशाला काय पाहिजे तिचे काही मेसेज जपून ठेवले आहेत कॅमेऱ्यात कैद काही आठवणी आहेत तिच्या सहवासातील काही गोष्टी आहेत अजून काय हवं. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मज शिकवलेली गीते बाबा काय सांगू आता त्याला मीच हवालदिल झालेलो. कधीपर्यंत थांबणार माझा प्रश्न शेवटच्या श्वासापर्यंत पोरगा चांगलाच पेटलेला होता का तर नाही किनाऱ्याना कळू देत मी अजून जहाज सोडलं नाही किती ओळखतो मला त्यांचा उलट प्रश्न मला त्यांचे शब्द नाकारणे त्यांच्या श्रमतांवर अविश्वास दाखवणे म्हणजे वाघाच्या तोंडात हात देण्यासारखेच होतं. जिद्द त्याच्या नसानसात भिडलेली त्याचं जिकणं म्हणजे माझ्यासाठी नित्याचीच होतं. ती माझीच व्हावी हा माझा अट्टहास नाही पण जर यात माझी खरंच काही चूक असेल तर ती मला सांगावी बस इतकंच. अबे काय राडा घालतोय आता हे काय नवीन हो ते तर करूच शकते ती माझ्यासाठी नक्कीच मी म्हटलो जाऊ दे ना यार तू जगलास ना वर्षभर तिच्या आठवणीत अजून काही दिवस बघ नाही तर नंतर घाल तुला हवा असलेला राडा नाहीतर संपवून टाक स्वतःला तुझ्याबरोबर तुझी प्रेम कहाणीपण राखरांगोळी. आम्ही एकमेकांबरोबर राहून बऱ्याच गोष्टी शिकलो होतो तो म्हणाला मी वेडा आहे तुला हे सर्व सांगायला त्याला माझ्याकडून काहीतरी हवं होतं तो म्हणाला मी असेल नसेल पण तिला आणि सर्वानाच कळू देत माझं खरं प्रेम मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या प्रेमाची कहाणी लिहशील का माझं तुझ्याकडे शेवटचं मागणं काम कठीण होत पण त्याच्यासाठी मी तर जीव द्यायलाही नेहमी तत्पर मग लिहणंतर माझा स्वभावच. मी होकारार्थी मान हलवली आणि त्यानं माझ्याकडे काही सोपवलं अगदी कायमस्वरूपी. आज नऊ महिन्यानंतर मी थरथरत्या हातानं लिहायला घेतलं कारण तो त्यादिवशी गेला आणि आजवर आलाच नाही कुठं गेला कळलंच नाही कधी परत येईल हेही ठाऊक नाही. जाण्यापूर्वी त्यानं मला दोघांच्या एकत्रित आठवणींचं गाठोडं दिलं होतं त्याजोरावरच ही कहाणीची आज सुरुवात करतोय. त्यांच्या प्रेमाच्या विश्वात मी कसा आलो आणि आता त्यांचाच होऊन बसलोय. त्याला खूप बोलायचं होत त्याला तेव्हा शक्य झालं नाही त्यानं शब्दात माझ्यासाठी अनेक कामे लिहून ठेवली होती आज मी ठरवलं मी त्याला शोधात राहील माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि तिच्या आठवणी मांडत राहील त्यांच्या मर्जीप्रमाणे.
तो आणि ती (भाग १)
संकलक- अविनाश पाटील





0 Comments: