कविता.असे होते जिभाऊ

कविता.असे होते जिभाऊ

 कविता. असे होते जिभाऊ



"कवितेतील जिभाऊ" देव माणूस ! म्हणजे माझे बाबा,बाप, माझे कुटुंब, माझा समाज ऐवडच नाही तर माझं स्मंद गावं बाबांना मानाने जिभाऊ! म्हणायच......


"प्रेमासारख्या अमृताचा पाझर ,

सर्वोच्चतेचं प्रमाण होते जिभाऊ,

कुठलही नात स्वार्थासाठी जोडल नाही,

असा प्रेमाचा सागर होते माझे जिभाऊ,

म्हणून खुप आठवण येते असे होते जिभाऊ.. !!


आशेचा किरण ममतेची तिजोरी ,

रिकाम्या खिशातील ठेव ठेवणारे होते जिभाऊ, 

अफाट कष्टाळू कधी हौस मौज न करणारे पण,

अडचणीत खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे होते जीभाऊ,

म्हणून खुप आठवण येते असे होते जिभाऊ.. !! 


चेहऱ्यावर हास्य परिस्थितीच ओझ वाहणारे ,

कुटुंबासाठी आयुष झिझविनारे होते जिभाऊ,

मुलांच्या अभिमानात भर पाढणारे ,

कुटुंबासाठी रक्ताचे पाणी करणारे होते जिभाऊ,

म्हणून खुप आठवण येते असे होते जिभाऊ.. !!

  

अतोणात कष्ट स्वप्न मुलांच्या प्रगतीच ,

स्वतः एक अनोखं व्यक्तिमत्व होते जिभाऊ,

चेहऱ्यावर कठोरता मनात आपुलकी,

नाती जपण्यासाठी झुकत माप होते माझे जिभाऊ,

म्हणून खुप आठवण येते असे होते जिभाऊ.. !!


आरे!दगडात तर सगळेच देव पाहतात  मी माझ्या जिभाऊत( बापात ) देव पाहिला....!!

म्हणून  सांगतो लक्षात ठेवा,,,,,,,,,,

बाप नावाचा माणूस जेव्हा आयुष्यातून निघून जातो,

तेव्हाच सुरू होतो. जीवन जगण्याचा खरा प्रवास ... "बोचतात असंख्य काटे "... तेव्हां कळतं बापाचं महत्व ..  आणि त्याचा तो खडतड प्रवास .......!!


आज माझ्या बाबांना, जिभाऊंना चार वर्षे पूर्ण झाले, ते मला कायमचे  सोडुन गेले,,,,,,

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो .......!!

                               

                *शाम परशुराम बैसणे*

1 comment

  1. प्रत्येकाला त्याचे वडील नजरेत समोर उभे राहिल्या शिवाय रहाणार नाही.. वाह.

    ReplyDelete