अखेर तिचा वनवास संपला...
केवळ इंटरनेट कनेक्शन नसल्याने डोंगरावर जाऊन अभ्यास करावा लागत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्नाली सुतारचा वनवास आता संपला आहे,डी डी सह्याद्री वाहिनीच्या बातमीची दखल घेत #प्रधानमंत्री कार्यालयाने भारत नेट योजनेअंतर्गत स्वप्नाली च्या दारिस्ते गावात अवघ्या दोन दिवसात केंद्र शासनाकडून हायस्पीड इंटरनेट कनेक्शन जोडून देण्यात आले.
केंद्र सरकारच्या भारत नेट प्रकल्प अंतर्गत देशातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याचे ठरवले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींपैकी 361 ग्रामपंचायती या फेज वन मध्ये समाविष्ट असून टप्प्याटप्प्याने या सर्व ग्रामपंचायती ग्रामपंचायतीना ऑप्टिकल फायबर नि जोडून सर्वांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे.
स्वप्नाली सुतार या गुणवंत मुलीची समस्या जेव्हा लोकल न्यूज पेपर ,लोकल न्यूज चॅनेल ,मराठी तसेच हिंदी न्यूज चॅनेल यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आली. त्याची दखल पीएमओ ऑफिस यां नी घेऊन मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (meity) सीएससी ई-गव्हर्नन्स चे सीईओ डॉक्टर दिनेश त्यागी यांनी राज्य समन्वयक वैभव देशपांडे मार्फत हा मेसेज रात्र साडेबारा च्या दरम्यान मला मोबाईल द्वारे मिळाला.
शनिवारी गणपतीची पूजा झाल्यावर सर्व टीमला याबाबत अवगत करून आम्ही दुपारनंतर सर्व टीम घेऊन ग्रामपंचायत दरिस्ते येथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी जोडण्याचे पहिले उद्दिष्ट ठरविले.
केंद्र स्तरावरून व राज्य स्तरावरून जी काही तांत्रिक मदत आम्हा लोकांना हवी होती ती सर्व मदत मिळाल्यामुळे आम्ही सायंकाळी पर्यंत ग्रामपंचायत येथे इंटरनेट कनेक्शन स्थापित करू शकलो.
मग शनिवारच्या रात्री ग्रामपंचायत येथे सरपंच महोदय आणि गावातील ग्रामस्थ व नातेवाईक यांच्याशी बोलून दुसऱ्या दिवशी स्वप्नाली च्या घरापर्यंत इंटरनेट स्थापन करण्याचे प्लॅनिंग करण्यात आले.
रविवारी सकाळपासूनच ऑप्टिकल फायबर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ओढत नेऊन स्वप्नाली च्या घरी सर्व अडथळ्यांना पार करीत इंटरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आले.
अशाप्रकारे स्वप्नाली आज सकाळपासून घरी बसूनच आपल्या लॅपटॉप व मोबाईल द्वारे कॉलेजमधील सर्व ऑनलाईन क्लासेस अटेंड करू लागली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींपैकी 361 ग्रामपंचायती या फेज वन मध्ये समाविष्ट असून टप्प्याटप्प्याने या सर्व ग्रामपंचायतीना ऑप्टिकल फायबरने जोडून सर्वांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने भारतातील ग्रामीण भाग सुदधा अशाप्रकारे जगाशी जोडला जाणार आहे . स्वप्नालीला या योजनेचा लाभ झाल्याने तिचा ऑनलाइन अभ्यास घरूनच सुरक्षितपणे सुरू झाला आहे . सर्व ग्रामपंचायत जोडल्या गेल्याने कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन मध्ये सुदधा विद्यार्थ्यांचा अभ्यास अखंडित राहणार आह





0 Comments: