कविता : श्रावणधारा

कविता : श्रावणधारा

 श्रावण धारा



आल्या आल्या श्रावण धारा

सृष्टीला घेऊन नवा उभारा ||धृ||

हिरवा शालू लेऊन नटली

नवतरूनी ही जशी बहरली

केला जणू तिने शृंगार सारा ||१||

कडे कपारीतून उतरून खाली

सरिता ही धावत आली

तहनल्याना तृप्त केले 

 प्राशून आपल्या अमृत धारा ||२||

पाना फुलांची माळ ही सजली

भासे मना ही किमया कसली

निसर्गाचा खेळ च न्यारा ||३||

सौंदर्य पाहून रुपवतीचे 

पारणे फिटेल माझ्या मनाचे

थूई थुई नाचे फुलवून मोर पिसारा ||४||

        - कवी गजलकार नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)

मो. ७५१७३८९७४६

0 Comments: