तो आणि ती भाग- १०

तो आणि ती भाग- १०

   तो आणि ती 



तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)


'तुला नको असलं तरी मला शेवटचं भेटायचं आहे' 


अचानक मदतीसाठी तिचा मला आलेला कॉल पाहून मी थोडा गोंधळात पडलो मात्र लगेच सावरत त्यांच्या शोधाचा पुन्हा निर्धार केला. न सांगता गेलेला तो माझ्या मागे अनेक प्रश्न, समस्या, आठवणी आणि बऱ्याच वस्तू अर्धवट अवस्थेत सोडून गेला होता. त्यांच्या प्रेमाची गोष्ट लिहिण्याची जबाबदारी तर माझ्यावर होतीच मात्र अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आणि प्रसंग का उपस्थित झाले असावेत हे शोधण्याचे मोठे कामही माझ्यामागे आता लागले होते. खूप दिवसांनी ती माझ्यासमोर आली अगदी त्याने वर्णन केली तशीच दिसत होती पुन्हा. खरचं तिला पाहून राग कसा शांत होतो हेच कळत नाही असं त्यानं वारंवार सांगितलेले आज माझ्या बाबतीतही घडले. त्याचा सर्वात जवळचा मित्र मी हे तिलाही अगदी चांगलंच माहीत होतं. आज आम्ही भेटलो होतो ते तिच्या विनंतीवरून. मी त्याला भेटण्यासाठी बोलले होते तो मला सोडून जावा किंवा त्याने माझ्याशी बोलूच नये असं काहीच माझ्या डोक्यात नव्हतं मला आजही आवडतो तो... खरंतर त्याला कधी विसरता येणारच नाही... त्याच्या सानिध्यात आलेल्या कोणालाच त्याला विसरता येणार नाही, अगदी स्वछंदी आयुष्य जगणारा, स्वभाव अतिशय आक्रमक असला तरी सर्वांची खूप काळजी त्याला, तुमच्या दोघांच्या मस्तीच्या अनेक घटना अगदी तोंडपाठ त्याला, नेहमी कसलातरी विचार डोक्यात आणि काम करण्याची पद्धत काही औरच होती त्यांची, मस्ती करायचा खूप पण कोणाला दुखावेल असं सहसा तो वागतच नसे. ती श्वास रोखून बोलत होती. मुली कदाचित त्याला आवडायच्या नाहीत आजही इतर आवडत नसतील, मीच त्याला पहिल्यांदा विचारलं प्रेमाबद्दल. भेटून एक मिनिट देखील झाला नव्हता आम्हांला आणि हिने आठवणींची बरसात चालू केली होती. विश्वास ठेवावा की नको अशा द्विधा मनःस्थितीत मी होतो. लगेच नजर माझ्याकडे वटारत ती म्हणाली मी खोटं बोलूच शकणार नाही, विश्वासघात देखील तुझा होणार नाही. जी प्रेमाची गोष्ट तू मांडत होता ती माझी आणि तुझ्या मित्रांची होती हे नक्की. मात्र त्यांतील मांडलेली प्रत्येक गोष्ट किती खरी आहे हे फक्त आम्हालाच माहीत. तिच्या या वाक्यांत मला तिच्यावर विसंबून राहणे असा अर्थ जरी असला तरी तिला माझ्या मदतीची अधिक आवश्यकता होती हे तिने मला स्पष्टपणे सांगितले. आज साधारण दोन वर्षे होतील त्याचा फोटो अगदी तसाच आहे कॉलर आयडीवर, नावही तसचं सेव्ह आहे. वेळ माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरं देईल असं वाटलं होतं मात्र ती वेळ काही येतंच नाही ती हताश होवून सांगत होती. माझी चूक झाली त्यांच्याशी बोलणं का थांबवलं मी? काय झालं होतं नेमकं? तो जवळ असता तर शांतपणे सर्व ठीक झालं असतं आता. ही पोरगी नेमकं काय बोलत होती सांगत होती ते मला काही कळलंच नाही. एकदा भेटायचं आहे त्याला... विचारायचं आहे का नाही समजावलं मला... का सोडून गेला एकटीला... रागावला का नाहीस माझ्यावर... सोडून जाण्यासाठीच प्रेम केलं होतं का माझ्यावर... तिच्या शब्दांत ओढ होती, प्रेम, जिव्हाळा आणि त्याला भेटण्याची, घट्ट कवटाळून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून क्षणभर विसावा घेण्याची उर्मी स्पष्टपणे जाणवतं होती माझ्यापुढे मात्र प्रश्न हा होता की तो नेमका कुठे आणि कसा असेल? ती म्हणाली... 


'त्याला नको असलं तरी मला शेवटचं भेटायचं आहे त्याला'


तो आणि ती ( प्रेम नावांची गोष्ट)

भाग- १०

'

(क्रमश भाग एक ते आठ च्या पुढे)

लेखन- अविनाश पाटील

0 Comments: