बोधपर कथा
एकदा वाघ व गाढव यांच्यात भांडण होते.हे भांडण सिंहाच्या दरबारात पोहचते. काय भांडण झाले असावे हे ऐकण्यास दरबारात शांतता व उत्सुकता वाढीस लागते.
हं,बोला! काय अडचण आहे तुमची ? सिंह महाराज म्हणाले .
महाराज,हे गाढव म्हणते गवत पिवळे असते,मी म्हणालो गवत हिरवे असते .यावर सिंहाने गाढवाला विचारले,हा वाघ सांगतो ते खरे आहे का ? हो तर . गवत नुसते पिवळे नसुन ते प्राणी,पक्षी,मनुष्य यांच्या जीवनात प्रथम स्थानी आहे.गवतच महान आहे.
वाघ म्हणाला,महाराज मी गाढवाला म्हणालो नुसते गवतच नव्हे तर वेली, झाडाचा पाला,फुले,फळे हे सुध्दा प्राणी-पक्षी,मनुष्य यांचेसाठी महत्वाचे आहेत.पण हा गाढव हे मान्यच करीत नाही.ते म्हणते सर्व प्रथम ग़वतच उगवले तेच महान.मी म्हणालो अरे,विज्ञान सांगते पहिले जीव पाण्यात निर्माण झाले,नंतर बाकी जीव.
सिंहाने दोघांचे बोलणे ऐकून घेतले व सिंहाला शिक्षा जाहिर केली.वाघाला शिक्षा होताच गाढव उड्या मारत,भेसूर आवाजात ओरडत पळत सुटले.दरबारात निरव शांतता पसरली. मध्येच वाघ म्हणाला महाराज गवत हिरवे असते,इतरांचे हि महत्व महान असते हे सत्य असून हि आपण मला शिक्षा जाहीर केली.
सिंह म्हणाला,गवत हिरवे असते हे चराचराला माहित आहे.गाढव म्हणते गवत पिवळे असते.तुला गवताचे ज्ञान असून हि तु त्या मुर्ख गाढवाशी भांडत बसलास म्हणून तुला शिक्षा.
सिंह दरबाराला म्हणाला,मित्रांनो हा निसर्ग नटला तो फक्त गवताने नव्हे तर या वेली,झाडे,फुले,फळे यांचे महत्व हि मोठे आहे.ते गाढव ज्या भागात वावरते तेथील गवत मरायला आल्याने ते पिवळे झाले.त्या गाढवाने अजून आजुबाजूचा निसर्ग पाहिला नाही.अशा अज्ञानी गाढवाशी न भांडता आपण निसर्ग कसा जतन करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.प्रत्येकाचे महत्व वेगळे व महान असते हे लक्षात ठेवा.
तात्पर्य : मुर्खांशी वाद घालणे हे ज्ञानी माणसाचे काम नाही.गाढवाच्या ओरडण्याने नव्हे तर वाघाच्या डरकाळीने जंगल धीर-गंभीर होते.समाज ( समाज म्हणजे सर्व जाती-धर्म यांचा समुह ) हा कोणा एकामुळे नाही तर अनेकांच्या कर्तृत्वाने घडत असतो.




0 Comments: