अखेर कोरोनाशी लढताना सिद्धार्थ गायकवाड यांची प्राणज्योत मावळ

अखेर कोरोनाशी लढताना सिद्धार्थ गायकवाड यांची प्राणज्योत मावळ

सिद्धार्थ गायकवाड 

               अखेर कोरोनाशी लढताना सिद्धार्थ गायकवाड यांची प्राणज्योत मावळली

कल्याण-डोंबिवली वार्ताहर :पी.एन. बेटकर 

 कल्याण-डोंबिवली :-(दि. १४/०९/२०२० )विशेष शाखा केंद्र, कल्याण येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सिद्धार्थ गायकवाड यांना दि. ११/०९/२०२० रोजी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी पाटीदार भवन कोविड सेंटर, डोंबिवली येथे भरती करण्यात आली होती. प्रकृती खालावल्याने त्यांना काल दि. १३ सप्टें. रोजी पुढील उपचारासाठी आयुर हॉस्पिटल, कल्याण (पूर्व) येथे दाखल केले असताना त्यांची प्रकृती अति खालावल्याने ते लढत असलेल्या कोरोना संसर्गाला त्यांचं शरीर पुरेशी साथ देऊ शकलेलं नाही शेवटी आज दि. १४/०९/२०२० रोजी सायंकाळी १६.४५ वा. एक देशाच्या सुरक्षतेसाठी दिवस रात्र झटणारी अशी जबाबदार व्यक्ती काळाच्या पडद्याआड झाली असून कल्याण पोलिस शाखेला त्यांची कमी भासत आहे. अश्या या महान व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments: