कविता:-विहार

कविता:-विहार

 विहार 


जाऊनिया विहारा मध्ये 

कर जोडुनि करू वंदना 

मिळे शांती तुमच्या मना 

मिळे शांती माझ्या मना ||धृ||


मानसा मानसात दुरा नसे 

समानता येथे वसे 

अज्ञानता होई दूर येथे 

मार्ग ज्ञानाचा असे 

झटकू रूढी परंपरा 

मुक्त साऱ्या बंधना ||१||


बौद्ध धम्म आहे आगळा 

बाबा भिमाने दाविला 

त्याच मार्गी जाऊ चला 

जगण्या साठी आहे भला

करुणा वसे तुमच्या मनी 

 हृदयी खुलल्या स्पंदना ||२||


अंधश्रद्धा ना येथे 

देव धर्मा थारा नसे

२२ प्रतिज्ञा रुजवा मनी 

आचरणा नरेश बंधन असे 

आचरणी असावी पंचशीला 

असी असावी साधना ||३||


       - *कवि नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)*

_मो.७५१७३८९७४६_

0 Comments: