लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख पदी सावंत.
सिंधुदुर्ग : लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था देशभर ग्राहकांचे हितासाठी काम करत आहे. या साठी लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुखपदी मा. शंकर वासुदेव सावंत यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रराज्य अध्यक्ष मा. दिनकर आमकर साहेब यांनी सावंत यांना नियुक्ती पत्र दिले. जिल्यातील सर्व प्रकारच्या खरेदी -विक्रीच्या आणि सर्व विक्री पश्चात प्राप्त होणाऱ्या गैरव्यवहारांच्या तक्रारी बाबत सावंत संस्थेच्या वतीने अंमल बजावणी करतील. या वेळी सरचिटणीस सुरज जमणे, राहुल पलंगे व कार्यकर्ते उपस्थित होते.




Best of luck sir
ReplyDelete