कल्याण उपनगर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हवा, कडोंमपा निवडणुकीतही महापौर बनवूया...
--- राष्ट्रवादी युवक जिल्हा पदाधिकार्यांच्या बैठकीत निर्धार...
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक प्रदेश युवकचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली युवक जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली.
या बैठकीत आगामी कल्याण उपनगर परिषद व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी युवकने आतापासून कामाला लागा असे असे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच आगामी महापालिका व नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच चांगली चमकदार कामगिरी करेल असा विश्वास युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी व्यक्त केला. या बैठकीत प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील, गिरीश पाटील, नितीन लोहोटे, सुभाष गायकवाड, भावेश सोनवणे, सचिन काकडे, संतोष जाधव, विश्वास आव्हाड, शशांक माने, आकाश कांबळे, गणेश भोईर, कल्पेश आहिरे, राहुल पाखले, विजय पाटील, शरद गवळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





0 Comments: