कविता : दुःखाचे कारण तृष्णा

कविता : दुःखाचे कारण तृष्णा

कविता : दुःखाचे कारण तृष्णा 


दुःखाचे कारण तृष्णा जेव्हा उमगले होते 

मार्ग सत्याचा आनू सरावा बुद्ध वदले होते ||धृ||


अती धनाचा मोह नसावा 

गरजे पुरता संच असावा 

आधिकच्या मागे जिवन पळते समजले जेव्हा होते ||१||


आर्य सत्य समजून घ्यावे 

दहा पारमीता आनू सरावे 

पंच शिलांचे पालन करूनी सुखी जीवन होते ||२||


अंधश्रद्धा मुळी नसावी 

रूढी परंपरा त्यागूनी द्यावी 

मानवतावादी धम्म नरेशा जानले जेव्हा होते ||३||


         - कवि नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)

मो. 7517389746

0 Comments: