शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण करणाऱ्या तरुणाची सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी महिलेविरोधात अदखलपत्र गुन्हा

शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण करणाऱ्या तरुणाची सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी महिलेविरोधात अदखलपत्र गुन्हा

  शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण करणाऱ्या तरुणाची सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी महिलेविरोधात अदखलपत्र गुन्हा

    डोंबिवली ( शंकर जाधव ) शासनाच्या आर्थिक सर्वक्षणाचे स्वयंसेवक म्हणून  काम करणाऱ्या एका गरीब मुलाची कोणतीही खातरजमा न करता सोशल मिडीयावर त्याचा फोटो आणि बदनामी करणारा मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी एका अतिउत्साही महिलेविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी येथे शासनाच्या आर्थिक जनगणना मध्ये काम करणारा तरुण ओळखपत्रसह शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत जनगणना करत होता. मात्र या तरुणावर संशय घेत एका महिलेने त्याच्याकडे चौकशी केली.सदर तरुणाचे त्याच्याकडील ओळखपत्र आणि आपली सर्व माहिती दिली. त्यानंतर तो ज्याच्याकडे काम करत होता त्या कार्यालयातील प्रमुखांशी मोबाईलवर बोलणे करून दिले.चौकशी केल्यावरहि महिलेन त्याचा फोटो आणि बदनामी करणारा मजकूर सोशल मिडीयावर व्हायरल केला.या तरुणाला न्याय देण्यासाठी भाजप डोंबिवली ग्रामीण महिला मंडळ अध्यक्षा मनीषा राणे यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात बदनामी करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या.पोलिसांनी या प्रकरणी वेळीच लक्ष देणे आवश्यक होते. वास्तविक जर तरुणावर संशय  होता तर तरुणाला महिलेने पोलीस ठाण्यात नेणे हे नियमाला धरून होते परंतु शहानिशा न करता त्याची बदमानी करणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न मनीषा राणे यांनी यावेळी उपस्थित केला.  

0 Comments: