बंजारा समाजाच्या गोरबोली भाषेचा घटनेच्या भारतीय मातृ भाषेच्या अनुसूचित समावेश करण्याची खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी

बंजारा समाजाच्या गोरबोली भाषेचा घटनेच्या भारतीय मातृ भाषेच्या अनुसूचित समावेश करण्याची खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी

 बंजारा समाजाच्या गोरबोली भाषेचा घटनेच्या भारतीय मातृ भाषेच्या अनुसूचित समावेश करण्याची खाडॉश्रीकांत शिंदे यांची मागणी

 

डोंबिवली साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा असलेल्या गोरमाटी (बंजारासमजाच्या गोर बोली भाषेचा भारतीय घटनेच्या मातृ भाषेच्या  व्या अनुसूचित समावेश करावाअशी आग्रही मागणी खासदार डॉश्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली.गोरमाटी (बंजारासमाज हा मूळ या देशाचा असून जगात सुंदर वैभवशाली संस्कृती असलेल्या समाजाचे देशातील प्रत्येक राज्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहेभारतात १० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला हा समाज महाराष्ट्र (९० लाख लोकसंख्या)तेलंगणा ( कोटी)कर्नाटक (.२५ कोटी)आंध्रप्रदेश (७० लाख)उत्तरप्रदेश (३० लाख)राज्यस्थानगोवामध्यप्रदेश  इतर अनेक राज्यांमध्ये विखुरलेला आहेत्यामुळे बंजारा (गोरबोलीभाषा देशात मोठया प्रमाणात बोलली जातेत्यांच्या गोरबोली’ भाषेची लिपी नसल्याने त्यांचा इतिहास तोंडी परंपरेद्वारे जिवंत राहतोया समुदायाची प्राचीन संस्कृती आणि वारसा आणि भाषेला स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात घटनेनुसार मान्यता मिळाली नाही.तसेचसाहित्य अकादमीने बऱ्याच प्रमाणात साहित्य आणि पुस्तके गोरबोली भाषेत लिहिली आहेत आणि त्यांचा इतिहास नोंदवून त्यांची भाषा आणि तोंडी परंपरा जपण्याची गरज आहेआपल्याकडे बंजारा भाषा ही सांस्कृतिकसामाजिकआर्थिक आणि राजकीय जीवनातील परिप्रेक्षात पाहिली पाहिजेअसे प्रतिपादन करून  घटनेच्या  व्या अनुसूचीमध्ये या गोष्टींचा समावेश करुन गोरबोली (बंजाराभाषा विकसित व्हावी म्हणून खासदार डॉश्रीकांत शिंदे यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. बंजारा भाषा (गोरबोलीला मान्यता मिळावी म्हणून मागील अनेक वर्षापासून मागणी करत आहेयापूर्वी राज्य सरकारने २०१९ मध्ये केंद्र सरकारकडे शिफारस देखील केली होतीपरंतु आज पर्यंत या भाषेस राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाला नाहीयाची दखल घेत खासदार डॉश्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे अखेर संसद नियम ३७७ अंतर्गत खा.डॉ.शिंदे यांनी संसदेत मागणी केली.

0 Comments: