कथा : गाठोडे ( भाग २० वा)
जिवनात काहितरी चूकल्याचा आभास झाला आणी मन खिन्न होऊन उदास झाले होते केवढे मोठे नुकसान झाले याची जाणीव अंतस्थमनाला झाली असता आणी आपोआप डोळे मिटूले गेले नंतर गच्च भरुन आले, संसार सांभाळणे जमलेच नाही वरकर्णी फक्त मनाला आतून दिलासा दिला जात होता पण ती खचण्या-यातील स्त्री नव्होती ती तर इतके वर्ष दुर राहून तावून सुलाखून निघालेले होती काही करुन आपल्या नव-याला हसील करण्याचे तिने मनात खूनगाठ मारली म्हणून ती जे जे करता येईल ते ते करत राहीली.
भटू घरी येवून गेला मात्र तो हाताला लागला नाही. आईने आणी आण्णांनी जे केले ते तिला अजीबात पटले नाही. म्हणून ती मनातच दात होट खात तळमळू लागली या भटूला तर मी सोडणार नाही कच्चे खाईल माझे काही होवो मी म्हणत तीने आपल्या स्पर्श मधून शेलफोन काळला आणी भटूचा मोबाईल नंबर डायल केला रिंग वाजली आणि भटूने ते बघीत होता पण त्याचे मन फोन घेण्यास धजत नव्हतं त्याने फोनची रिंग वाजली आणि तो विचारात बुडाला.ईकडे मनूने मन घट्ट केले मनातल्या मनात हसत हसत म्हणाली,भटू किती दिवस असा माझ्यापासून दूर पडसील एक न एक दिवस तूला राम देवाच लागेल हे मात्र तु विसरु नकोस. तसाच तिचा विचार पालटला नाही भटू कामात असावा.
मनूचे मन पुन्हा-पुन्हा तिला तेच म्हणत होते का वागतो भटू माझ्याशी असा संपर्क साधला असता त्याचे ही व्यवस्थीत उतरते देत नाही. काय करावे या माणसाचे समजत नाही. तिचे एक मन म्हणत होते आयुष्यभर माझ्याकडे मी येईल या आशेने याचना करणारा असा कसा बदल झाला त्याच्यात कळत नाही.
तिला तिचे मागचे दिवस आठवले ति त्याच्याकडे लग्नासाठी तिचे कागदपत्रे घेवून आले होती तेव्हा भटू नुसताच बघत होता तिला वेळो-वेळी त्याच्या जातीची आठवण करुन देत होता पण तेव्हा मनूच म्हणाली, मला तुझ्या जातीशी काहीही घेणे देणे नाही ? तु आताच माझ्याशी लग्न कर, नाहीत मला येथेच खलास कर भटूने आज पर्यंत उंदीर ही मारला नाही आणी तो जित्याजागत्या माणसाचा जीव कसा घेईल हे त्याला शक्य नव्हते म्हणून तो लग्नाला तयार झाला होता.
ब्राम्हणांचा जावाई झालो काय मोठी बाब
पण ति जेव्हा चुकून आली माझ्याकडे
तेव्हा मी म्हणालो,
'अशी कशी चुकली दिशा
चंक महारवाडयात लागावे पदम तुझे, !
ती लाडात आली गड्यात टाकला हाताचा विळखा
ती म्हणाली, सका, प्रियेत्मा मारुन मनूला लाथ
आली संसार थाटाया तुझ्याकडे
सांग काय करु ! जावू माघारी का धरतो माझा हात ?
माझा नाईलाज झाला ?
तसा भटू भित्राच आहे म्हणा, पण त्याने लग्नाचे मोठे धाडस केले होते चक्क विवाहा नोंदणी ऑफीस मधे जावून अंतरजातीय लग्न केले होते.त्याच्या या हिम्मतीला तीने त्यावेळीस दाद दिली होती. तेव्हा पासून तिने त्याच्यावर जीव ओवाळून टाकला होता.आणी आज काय झाले त्यानेच तिला मध्यान मधे सोडून दिले.
मनूचा फोन आला तो बैचेन झाला त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं सर्व कामे सोडून तो फोनच्या बटणाशी चाळा करायला लागला होता. त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करून पाहीले तरी त्याचे मन फोनकडे वळत होते जसे आपल्याला जी गोष्ट करायची नाही तरी देखील आपले लक्ष त्याच्याकडे लागते तसेच भटूचे झाले होते. त्याच्या कडून राहीले गेले नाही आणी फोन रिडायल केला रिंग वाजली न वाजली मनूने फोन रिशिव केला आणी म्हणाली, भटू काही कामात होतास का फोन घेतला नाही. भटूने फोन तर केला पण काय बोलावे तेच त्याला काही क्षण सुचले नाही. भटूने नुसते हूम्म केले. तिचा जिव रडवा झाला होता. गडा दाटून आल्याने शब्द घशाबाहेर अपस्ट पडत होते. रडक्या आवाजातच बोलू लागली भटू मला तुला भेटायचे आहे मला तुला भेटायचे आहे. तु येणार ना ? माझ्याकडे माझे मन लागत नाही रे ! तु सांग मी कुठे येवू तु आता राहतो कुठे ते तरी मला साग मी तेथे येवून तुला भेटते.
भटू म्हणाला,मनू तू रडू नकोस पहीले गप्प राहा तरच आपल्याला बोलता येईल. तुझ्या अशा रडण्याने मला काहीच कळत नाही जरा थांब काय म्हणते ते निट सांग
तिच्यावर खरच आभाढ कोसळले होते. तिचा नवरा असून तो तिच्यापासून कोसो दुर होता. तिला तर रडू येणारच ना, ती थोडे आपले अश्रु पुसत रडत म्हणाली, भटू मला तुला भेटायचे आहे. सांग कधी भेटायचे. भटूने ही आढेवेढे करत तिची ईच्छा पुरी केली तिला म्हणाला हो, भेटू कुठे भेटायचे ते ठरले होते. भटूने तिला भेटण्यासाठी संमती दर्शवली होती तेव्हा तिच्या मनाला थोडी शांती जानवत होती भटूने फोन ठेवला होता .
मनू नटूनथटून बाहेर पडले होते. तिच्या मनात मुंग्या वारुडातून बाहेर पडावे तसे विचार तिच्या दाटीवाटीने बाहेर पडत होते.ति घरातून बाहेर पडण्यापूर्वी आईला साद घालत म्हणाली, आई, मी येते ग ! आईच्या कानावर तिचे मी येते ग शब्द पडताच सरीताबाई लगबगीने ही मुलगी कुठे निघाले बघण्यासाठी आल्या होत्या मनूने पहिल्यादा कितीतरी वर्षाने साजश्रुंगार करुन बाहेर पडताना बघून सरीताबाई चकीत झाल्या तिच्या कडे बघत तोंडांत बोट घालत म्हणाल्या, कुठे निघाली स्वारी बाई बाई माझी लेक कशी चवळीच्या हिरवळ शेग सारखी दिसते, माझ्या लेकीला कुणाची नजर नको लागायला म्हणून त्यांनी मनूला काळा टिका ही गालावरती लावला त्याने तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.
सरीताबाई आई मनूला म्हणाल्या, बेटा कुठे निघाले,कुठे ! मला काही बोलले नाहीस.
मनू म्हणाली, कुठे नाही ग आई ! भटूकडे चालली आहे. त्याने भेटायला बोलावले आहे मीच त्याला फोन केला होता त्याने मला बोलवले आहे. मी जाते त्याला भेटायला तु नाही म्हणून नकोस मोडा नको बघू ? सरीताबाईचा जीव कासावीस होत होता हि पोरगी कधी काय करेल समजत नाही असे मनोमन म्हणत त्या आतल्या आत धुमसत राहील्या मात्र मनूने मी येते ग आई म्हणत घरातून निघाली ती रिक्षाची वाट बघत होते. रिक्षा लवकर आली तर ति भटू जवळ लवकर पोचून शेकेल
मनातल्या गाभाऱ्यातल्या आशा तिच्या पल्लवीत झाल्या होत्या मनूने पहिल्यादा कितीतरी वर्षाने साजशृंगार करुन बाहेर पडण्याचे ठरवले होते. एकदम तिचा मनात विचारांचे गोंधळ चालु झाला तो मला पहील्या सारखा भेटेल ना ? माझ्याशी चांगले बोलेल ना ? त्याचा भरोसा नाही सास-याच्या देखत तो भर चौकात माझा अपमान करणार नाहीना ? भटूचे आज कालचे वागणे काही सांगता येत नाही. करेल का तो माझ्याशी चांगले चर्चा असंखे प्रश्न निर्माण होत होते पण ती निघाली होती. त्याला भेटायला तिचा विस्कळीत झालेल्या संसाराला पुन्हा नव्याने उभे करायला रिक्षा आली होती कशी तरी स्वत:ला सावरत ती बसली आणी रिक्षावाले काकांना म्हणाली, स्टेशनला घ्या काका.
रिक्षा भांडूपच्या नाळकर्णी निवासाच्या आवारातून निघाली सैरभैर धावत जाऊन ति रेल्वे स्टेशनच्या दिशेने वाटचाल करत आहेत त्यातून प्रत्येक वळणं घेत रिक्षा वाला सतत काहीतरी नवीन मनात गुंनगुनत आहे. पण मनूचे मन तिच्या जवळ नाही तिचे मन तर कधीच रेल्वे स्टेशनवर त्या गेटवर पोचून भटू कुठे थांबला आहे. ति त्याचा शोध घेत आहे. वळणावर वळण घेत रिक्षा रेल्वे स्टेशन वर येऊन ठेपली होती तरी ती त्याच विचारात गुंतली होती. तेवढ्यात रिक्षा वाला म्हणाला, ताई, येथेच थांबायचे ना का पुढच्या गेट वर घेवू ति त्या आवाजाने भानावर आली आणी म्हणाली हो, थांबा येथे मनूने आपल्या स्पर्श मधून पैसै काढले रिक्षाचे भाडे दिले ति भटूला इकडेतिकडे पाहू लागली पण तिला भटू कुठेच दिसत नव्हता तिच्या चेहऱ्यावर उदासीनता नाचू लागली आणी मनातल्या मनात म्हणाली,येतो की नाही भटू मला फसवत तर नाही ना ? नाही असे करणार नाही भटूचे मला माहीती आहे तो शब्दांचा पक्का आहे. ईतके वर्ष ओळखते मी त्याला.
भटू कधीच रेल्वे स्टेशनवर येवून बसला होता या ही पुर्वी तो कितीतरी वेळ असाच रेल्वे स्टेशन येवून मनूची वाट पाहात असायचा हे त्याला नविन नव्हतं त्यालाही माहीती होते की,मनूने बोलवले म्हणजे ति आल्या शिवाय राहणार नाही म्हणून त्याने स्टेशनवर येतानाच एक तृत्तपत्र विकत घेतले होते आणि तो ते चाळत बसला होता.
ईकडे तिकडे कुठे रघू दिसतो का बघत मनू एका तिच्या नेहमीच्या ठिय्याकडे तिचे लक्ष वेधले तिला भटू बसलेला दिसला आणि तिचा हर्ष गगणात माहावेना असा झाला ति, चोर पावलांनी रघूकडे गेली रघू पेपरात दडला होता त्याचे लक्ष तिच्याकडे नव्हते ती हळूच त्याच्या जवळ जावून बसली त्याला स्पर्श नकरता ती त्याला न्याहाळत होती त्याचे रुप आपल्या डोक्यात भरत होती पण तिच्याच कडून राहवले गेले नाही ति त्याला हळूच आवाजात म्हणाली,रघू कधी आलास मला येयायला उशीर झाला का ?
मुलगी घरातून बाहेर घाई घाईत गेल्याने सरीताबाई चिंतेत होत्या त्या मनातल्या मनात म्हणाल्या, या पोरीला वेडबिड लागले की,काय बडबडत करत राहिल्या. तेवढ्यात सुनेचा आवाज त्यांच्या कानावर पडले आणि आजूबाजूला बघत आले आले म्हणत घरात शिरल्या होत्या पण सुनेने सरीता बाईंना प्रश्न विचारला आई काय झाले ताई घाईघाईने निघाल्या काही काम होते का त्यांचे बाहेर.
सरीता बाई थोडे अर्धस्मित करत म्हणाल्या,काय काम
असणार गेल्या ताईसाहेब रघूला भेटायला .
सुनबाई म्हणाल्या," हे,काय ऐकते मी;
सरीताबाई म्हणाल्या, हो, ते खरे आहे.
सुनबाई म्हणाल्या,'पण आई,
सरिताबाई म्हणाल्या,हो ग बाई हे खरे आहे.
सुनबाई म्हणाल्या,आई भटू भावजी खरोखर भेटतील का ?
सरिताबाई म्हणाल्या, ते माहीती नाही पण पहिल्यादा माझी लेक साजशृंगार करुन गेली माझी लेक; तसे सरिता बाईला आनंद तर झालाच होता तरीही आईची जीव ना तो टांगणीला लागला होता टिनूसाठी कासाविस करत होत्या स्वत:शिस त्या म्हणाल्या,'देव करो माझ्या मुलीला यश येवो; !
सुनबाई म्हणाल्या,आई ताईने त्यांच्या मागे न लागता लग्न करुन घ्यायला हवे, त्यातच आपल्या सा-याचे हीत आहे.आई तुम्हाला नाही वाटतं
सरिताबाई म्हणाल्या,हो,ग बाई खुप वाटते पण माझे मेलीचे कोन ऐकते काहीच किंमत राहीली नाही मला ते गेल्या पासून असो बघू करते ना प्रयत्न बघू आपण सध्या काही बोलायला नको तिला. बघीतले ना तु किती आण्णावर भडकले होते. माझ्याकडे तर डोळे वटारले होते तीने मी खाली मान घातले कुठे तिच्या तोडाशी लागावे ति सध्या चिडली आहे वैतागली आहे तिला कितपत झेपते बघायचे आपण थकल्यावर हळूच तिचे मन परिवर्तन घडवून आणू आपण थोडा धिर धरा काय होते ते बघा
पण आई,ताई तयार होतील लग्नाला ? सुनबाई म्हणाल्या,मला तर नाही वाटत ज्या माणसासाठी अखे आयुष्य थांबल्या आणी तो माणूस आता समोर आला तर ते सहजासहजी तयार होणार नाहीत लग्नाला.
सरिताबाई म्हणाल्या, आपल्या हातात काय आहे कर्ता करवत तर तो आहे त्यांच्या मर्जिशिवाय झाडाचे पान देखील हलत नाही .मग आपण कोण नुसत्या कटपुतल्या,त्यांची मर्जि असेल तर सर्व काही घडेल समजल्या ! काही कामे राहीली असतील तर उरकुन घ्या बघू.
सुनबाई नुसते मान हालून संमती देत निघून गेल्या पण सरिताबाई रस्त्याकडे डोळे लावून टिनूची वाट बघत राहील्या मनातल्या मनात तळमळत
भटू हरचंद जगदेव जापीकर...





0 Comments: