सामाजिक बांधीलकीतून केला आमदार रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा

सामाजिक बांधीलकीतून केला आमदार रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा

 सामाजिक बांधीलकीतून केला आमदार रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा





डोंबिबली (ठाणे)   दि. २०/०९/२०२० (पत्रकार : प्रविण बेटकर)

        प्रख्यात डोंबिवलीचे आमदार व सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश मान. श्री रविंद्र चव्हाण यांच्या ५० व्या वाढदिवसा (गोल्डन ज्युबिली) निमित्त, भाजपा दक्षिण भारतीय सेलने कल्याण विभाग अध्यक्ष श्री. मोहन नायर यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कार्यालय रामनगर, डोंबिवली (पूर्व) येथे आज केडीएमसी सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, हँड ग्लोज, सॅनिटायझर्स आणि ब्रेकफास्टचे वितरण करून वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा नगरसेवक - विशु पेडणेकर, राजन आभाले, निलेश म्हात्रे आणि सोबत असलेले मिहिर देसाई, मितेश पेणकर व टीम (BJYM), भाजपा डोंबिवली (पूर्व) महिला मंडळाचे अध्यक्ष श्रीम. पूनम पाटिल उपस्थित होत्या. तसेच डोंबिवली पश्चिमेच्या "आपला घर वृद्धाश्रम" येथेही ब्रेकफास्टचे वितरण करण्यात आले. वाढदिवसाचे अवचित साधून कार्यक्रमास भाजपा पूर्व मंडळाचे अध्यक्ष श्री नंदू जोशी यांनी उत्तम मार्गदर्शन केले. व केडीएमसी 'ग' वार्डचे कामगार, वाहनचालक, मुकादम व कर्मचारी उपस्थित होते व पालिकेतर्फे मान. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले, उपस्थित सर्व मान्यवर व मंडळींचे आभार मानण्यात आले व तोंड गोड करून कार्यक्रमाची सांगता झाली.

0 Comments: