पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत
मोफत अँटीजेन टेस्ट
डोंबिवली ( शंकर जाधव ) आमदार रवींद्रजी चव्हाण व भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे ,डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, डोंबिवली शहर पूर्व मंडळ सचिव मनोज वामन पाटील यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक ७७ (दत्तनगर )मध्ये मोफत अँटीजेन टेस्ट (फँमिली डॉक्टर कोविड फायटर) करण्यात आली.यावेळी उमेश साळवी, राजेंद्र बेहनवाल, राजेंद्र कांबळे, शरद जैन, विजय यादव, हेमंत बारस्कर, राजेश विचारे, कोमल मनवर व प्रभागातील सर्व बूथ प्रमुख या सर्वांनी विशेष मेहनत घेतली. डोंबिवली शहर पूर्व मंडळ सचिव मनोज वामन पाटील हे प्रभागात सातत्याने सामाजिक कार्य करत असल्याने नागरिकांचे आभार मानले.





0 Comments: