कविता : फक्त भिमामुळे

कविता : फक्त भिमामुळे

 कविता : फक्त भिमामुळे 


भिमामुळे तूझा उद्धार झाला 
गावकुषा बाहेरचा तू गावात आला  ||धृ||
शिकला सवरला झालास मोठा 
नाही तुजला कशाचाही तोटा 
भामाची मिळाली तुला पुण्याई 
पण श्रेय दिधले तू दगड धोंड्याला  ||१||
भिमाची कमाई तुझ्या आली कामी 
शिकण्या सवरण्याची मिळाली संधी नामी 
भिमामुळे तुला सन्मान लाभला 
त्याच भिमा प्रती तू बैईमान झाला‌ ||२||
ओळख म्हणून धम्म धारण केले 
ब्रम्हा,विष्णू गौरी,गणपती हे दैवत मानिले 
बावीस प्रतिज्ञांचे ना पालन केले
शरण नाही गेला त्या त्रिशरणाला  ||३||
   - कवी नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)
मो.७५१७३८९७४६

0 Comments: