तो आणि ती
तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)
'तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये'
ये लाल इश्क ये मलाल इश्क ये ऐब इश्क ये बैर इश्क... इश्क... इश्क ह्याचं ओळी कदाचित त्यांच्या ओठी असतील असे असतांनाच सजना तेरे बिना म्हणजेच सानू एक पल चैन ना आवे सजना तेरे बिना असं का घडलं असावं? तिच्याच आठवणीत गुंतलेला तो आणि अनेक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने हताश झालेलो मी आता पुन्हा नव्यानं ही कहाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ताकते रेहेते तुम्हे सांझ सवेरे नैनोमें बसिया जैसें नैन ये तेरे... अशीच अवस्था मला तिची नेहमी दिसली. तिच्या नजरा शोधत असतं अगदी लपून छपून फक्त त्यालाच. तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गये चैन तेरे मस्त मस्त दो नैन हेच तो देखील गुणगुणत असेल स्वतःशीच. जानीया कच्चे धागे सच्चे प्यार दे तू तोडना तेरे बिन नहीं लगदा दिल मेरा ढोलना याप्रकारे स्वतःच्याच भावविश्वात रममाण झालेला तो मौत ना आयी तेरी याद क्यू आयी लंबी जुदायी... चार दिनोंका प्यार ओ रब्बा बडी लंबी जुदायी... तिच्या शांत राहण्याने अशीच अवस्था त्यांची झालेली असावी. मेरी नजरो में हैं तेरे सपने तेरे सपने में हैं नाराजी मुझे लगता हैं की बाते दिल कीं होती लफ्जोसें धोकेबाजी... कदाचित त्यांच्यात कमी झालेला संवाद अनेक अंगी बऱ्याच गोष्टीना कारणीभूत ठरला असावा. पण तिच्यांत गुंतलेला तो बाहेरच्या जगाला पूर्णपणे विसरलेला होता का? तो अगदी फिर ले आया दिल मजबूर क्या कीजे? रास ना आया रेहेना दूर क्या कीजे? तोसे नैना जबसे मिले... तोसे नैना जबसे मिले... खरचं इतकी सुदंर ती नक्कीचं असावी अशीच खात्री त्यानं केलेल्या वर्णनावरून दिसून येते. ओ रंगरेज तेरे रंग दरिया में डुबना हैं बस तेरा बनके नहीं रेहेना दुजा बनके हे अगदी हजार टक्के मला त्यांच्या बाबतींत सांगता येईल. तु जो नहीं तो ऐसे पिया हम जैसे सुना अंगना मोरा सय्या मोसे बोलेना... ह्या प्रश्नाचं उत्तरं शोधणं माझ्यासाठी हा संपुर्ण प्रवास रेखाटण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा होता. त्याच्या आयुष्यातील ती आणि हरवलेला तो आज आठवणींच्या गाठोड्यात मला नव्यानं दिसला अगदी बऱ्याच अंतराने. तो नेमका कुठे गेला असावा यांचा शोध मी आधीच थांबलेला होता आणि ती कशी असेल? काय करत असेल? हे प्रश्न देखील मला आता पडत नसतं. आणि आज अचानक इतक्या दिवसांनी तिचा मला मेसेज आला अगदी पाच सहा महिन्यानंतर आणि समोरून ती म्हणाली कदाचित तो तिकडे असावा माझी मदत करशील त्याला शोधण्यासाठी? मला त्याला भेटायचं आहे. आता माझ्याकडे तिचा नंबरही सेव करून ठेवलेला नव्हता मी फक्त तिचा फोटो पाहून होकार दर्शवला आणि कहाणीत हरवलेला तो शोधण्यास पुन्हा नव्यानं सज्ज झालो...
तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)
भाग- ९
(क्रमश भाग एक ते आठ च्या पुढे)
लेखन- अविनाश पाटील




0 Comments: