फेडरेशन ऑफ आर्टीस्ट असोसिएशनची डोंबिवलीत सभा संपन्न...
डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील संघटना व संघटना प्रमुख तसेच नाट्य,सिने सृष्टी,वाद्यवृंद सृष्टी,तमाशा,दशावतार,लावणी,कव्वाली,मेकअप मेन,नर्तक,लोककलावंत निर्माता,तंत्रद्न्य,कलावंत, सर्वांनी `फेडरेशन ऑफ आर्टीस्ट असोसिएशन` या एकाच संस्थे अंतर्गत एकत्रित येत पूर्वेकडील ठाकुर सभागुहात सभेचे आयोजन आयोजित केली होती.कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन व अनलॉक काळात ह्या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.आपल्या न्याय हक्कासाठी सरकारला जागे करण्यासाठी १६ सप्टेंबर २०२० रोजी चैत्यभूमि,दादर,मुंबई येथे `कलावंतांचा एल्गार मोर्चा` काढण्यात येणार आहे.ह्याच विषयावर चर्चा व मार्गदर्शन मान्यवरांकडुन ह्या सभेत करण्यात आले.सभेत मनोजभाई संसारे, कीशोरभाई म्हात्रे,हरेश शिवलकर,संतोषपरब,सुभाषजाधव,अभीनेत्री मेघा घाडगे,अस्मिता कदम,ऱाजुदादा कुलकर्णी,महेश दवंडे,अजितकुमार खांडेभराड, डॉ.प्रतिभा वाघमारे,अभिनेते सतिश नायकोडी,दिपकचाफेकर,अशोक नायडु,केतन कापडणे,मकरंद विष्णू तसेच विविध क्षेत्रातील कलावंत उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेते सतिश नायकोडी व प्रविण गायकवाड(शिवा) यांनीसांभाळली.सभेत सामाजिक अंतर,मास्क,सेनेटायजर वापरुन सरकारी नियमांचे पालन करण्यात आले.उपस्थितीतांनी राष्ट्रगित गाऊन ही सभा संपन्न झाली असे सभेचे अध्यक्ष अजितकुमार यांनी जाहीर केले.





0 Comments: