गावठी कट्टा बाळगणाऱ्यांच्या डोंबिवली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गावठी कट्टा बाळगणाऱ्यांच्या डोंबिवली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 गावठी कट्टा बाळगणाऱ्यांच्या डोंबिवली पोलिसांनी आवळल्या मुसक्या



(ठाणे, डोंबिवली वार्ताहर : पी.एन. बेटकर)

डोंबिवली पोलिस ठाण्याचे पो. नाईक चंद्रकांत शिंदे यांच्या माहितीनुसार दि. ०७ सप्टेंबर २०२० रोजी, १९ .०० वाजेच्या सुमारास वपोनिरी / एम के चौहान, अजय किर्दत व त्यांचे पोलीस सहकाऱ्यांनी वेळीच साफला रचून गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपी सोमनाथ शंकर देवकर (वय-३८) रा. टंडनरोड डोंबिवली (पुर्व) याला पोलिसांनी पकडून चौकशी केल्यास गावठी कट्टा माझा नसून साथीदार मंगेश काळू शेलार (वय-२८) रा. दत्तचौक, डोंबिवली(पूर्व) याचा असल्याचे समोर येताच पोलिसांनी आरोपी मंगेशला ताब्यात घेऊन पोलिसांनी साफळा रचून केलेल्या कामगिरीला यश आले दोन्ही आरोपींना डोंबिवली पोलिस ठाण्यात अटक केली व विनापरवाना कोणतेही हत्यार वापरू नये या कायद्याचा भंग केल्याने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

0 Comments: