अंनिस  तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चमत्कार सादरीकरण स्पर्धेत आनंदी जाधव, अतुल सवाखंडे प्रथम

अंनिस तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चमत्कार सादरीकरण स्पर्धेत आनंदी जाधव, अतुल सवाखंडे प्रथम

 अंनिस  तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चमत्कार सादरीकरण स्पर्धेत आनंदी जाधव, अतुल सवाखंडे प्रथम



ठाणे  प्रतिनिधी  : मिलिंद जाधव 



 गणेश दुग्धप्राशनाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदा चमत्काराचा पर्दाफाश करणाऱ्या सादरीकरणाची ऑनलाईन व्हिडिओ राज्यव्यापी स्पर्धा आयोजित  करण्यात आली होती. या स्पर्धेच्या निकालाची घोषणा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. यात नाशिकच्या आनंदी जाधव व चाकणचे  आतुल  सवाखंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. अशा प्रकारचा पहिल्याच  स्पर्धेसाठी उत्तम प्रतिसाद मिळून एकूण ९० व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. या स्पर्धेत  कार्यकर्त्यांचे कुटुंबीय गट:  प्रथम आनंदी जाधव( नाशिक)द्वितीय  अमूर चैताली शिंदे (ठाणे )  तृतीय तनवी सुषमा परेश  (धुळे) उत्तेजनार्थ सई  भोसले (सोलापूर )विश्वा गणेश शेलार(भिवंडी )  अंनिस  कार्यकर्ता गट: प्रथम अतुल सवाखंडे( चाकण )द्वितीय चंद्रकांत शिंदे (सांगली )तृतीय भास्कर सदाकळे (तासगाव) उत्तेजनार्थ किशोर पाटील( टिटवाळा ) उत्तेजनार्थ दत्ता  बोंबे (कल्याण) अशा धनाले (मिरज)   


इतर खुला गट : उत्तेजनार्थ तेजस्विनी योगेश (नाशिक) धनराज रघुनाथ (चंद्रपूर)  या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कोल्हापूर येथील चित्रपट नाट्य परीक्षक डॉ. अनमोल  कोढाडिया व  अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी काम पाहिले,  तर स्पर्धेचे संयोजन समितीचे राज्य सरचिटणीस नितीन कुमार राऊत,  सुरेखा भापकर,  डॉ.ठकसेन   गोराने, श्रेयश भारुळे,  अवधूत कांबळे यांनी केले.

0 Comments: