सदा सावध तो सदा सुखी
(ज्ञान हाच देव)
जीवनविद्येचे ध्येयच आहे की "हे जग सुखी व व्हावे हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जावे." जगाला सुखी करण्याचे सामर्थ्य फक्त हिंदुस्थान या राष्ट्रातच आहे,
इतर कुठल्याही राष्ट्रात ते सामर्थ्य नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. इतर राष्ट्रे जी आहेत ती फक्त स्वतःचाच विचार करतात. जगाला सुखी करण्याचा विचार फक्त भारतीय संस्कृतीच करते.
आम्ही म्हणतो, हे राष्ट्र प्रगतीपथावर गेले पाहिजे. संपूर्ण जगात या राष्ट्राच्या शब्दाला किंमत आली पाहिजे. हे राष्ट्र सांगेल ते सर्वांच्या कल्याणाचे असेल, सर्वांच्या हिताचे असेल असे त्यांना वाटले पाहिजे. इतके वजन आपल्या राष्ट्राच्या शब्दाला असले पाहिजे. जीवनविद्येत या सर्व गोष्टी येतात.
इथे फक्त देव देव नाही. जीवनविद्या सर्वच क्षेत्रांचा विचार करते, जीवनविद्या व्यक्तीचा विचार करते, कुटुंबाचा विचार करते, समाजाचा विचार करते, राष्ट्राचा विचार करते, विश्वाचा विचार करते.
मला असे वाटते की हा एकच संप्रदाय असा आहे की, जो व्यक्ती पासून विश्वापर्यंत सर्वांचाच विचार करतो. वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करतो, इथे कुठलीही अंधश्रद्धा नाही, कुठल्याही तऱ्हेची तार्किकता नाही. इथे अनुभव घेता येतो. हा सूर्य, हा जयद्रथ, असे जीवनविद्येचे तत्वज्ञान आहे.(क्रमशः)
--- सद्गुरु श्री वामनराव पै.




0 Comments: