मिठीत घ्या की मला (लावणी गीत)

मिठीत घ्या की मला (लावणी गीत)

 मिठीत घ्या की मला

(लावणी गीत)





पंधरा झाली पूर्ण आता, वरीस लागलं सोळाss

अहो पावणं जरा मिठीत घ्या की मलाss

अहो पावणं जरा मिठीत घ्या की मलाss


मनात भरते तनात झरते बाधा झाली सोळाची,

मदनमोहना तुम्हा पाहता

लाही लाही अंगाची

तुमच्या मागे धावून आता, पायी आला गोळाss

अहो पावणं जरा मिठीत घ्या की मलाss

अहो पावणं जरा मिठीत घ्या की मलाss


गोऱ्या अंगा चुंबत झोंबे खट्याळ नटखट वारा,

मनात येते दाटून आणिक रिमझिम येती धारा

आग मनाची भडकून येता, दाह करिती ज्वाळाss

अहो पावणं जरा मिठीत घ्या की मलाss

अहो पावणं जरा मिठीत घ्या की मलाss


नजरेलाही नजर भिडता ओढ मनाला स्पर्शाची,

साद घालुनी हृदयावरती

फुंकर मारा प्रेमाची

धुंद मोगरा अलगद हाती, केसामध्ये माळाss

अहो पावणं जरा मिठीत घ्या की मलाss

अहो पावणं जरा मिठीत घ्या की मलाss


■■■

© विजो

विजय जोशी

डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)

९८९२७५२२४२

1 comment

  1. कडक साजरिकरण
    गोऱ्या अंगा चुंबत झोंबे खट्याळ नटखट वारा,
    क्या बात है........

    ReplyDelete