तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)

तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)

 तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)



भाग- १३


तो सहसा कोणाशीही बोलत नसे मुलींशी मुळीच नाही आम्हीं एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो त्याला चालायचा खुप कंटाळा होता त्यांचा हात पकडुन त्याला जबरदस्ती चालवायला लागायचे. बाहेरचं खायला आवडत नसे त्याला दोनचार गोष्टीचं आवडायच्या त्यांत तो समाधानी रहायचा ती प्रत्येक गोष्ट मला सांगायची आणि मी नव्याने त्याला अनुभवायचो. तिने त्यांची ओळख आपल्या घरी करून दिली होती तो तिचा जवळचा आणि काळजी घेणारा मित्र म्हणून परिचित होता. त्याला कामात परफेक्शन लागायचं कमी वयात खुप नावं झालयं म्हणुन तु असा वागतोस का मी त्याला एकदा विचारलं होतं त्यांची उत्तरें आणि समजावुन सांगण्याची पद्धत त्यांच्या अजुनच प्रेमात पाडायची. तो तुझ्या समोर आला तर तु काय करशील? मी तिला प्रश्न विचारला ती म्हणाली खरंतरं आम्हीं एकमेकांवर खुप प्रेम करायचो आजही करतो. आमच्यात काय वाद झाले आणि आमचा संवाद का तुटला, बंद झाला हे आमचं आम्हांलाच माहीत इतरांना ते कारण शोधूनही सापडणार नाही. तो समोर आला की त्याला घट्ट मिठी मारणार माझी करंगळी त्यांच्या ओठावरून फिरवणार आणि एक मस्तसा सेल्फी काढणार. आणि तो आलाच नाही तर? ती शांत झाली इकडंतिकडं बघु लागली अनेक गोष्टी हातांतून निघून गेल्याचं शल्य तिच्या चेहऱयावर जाणवत होतं, तो मला सोडून कुठं जाणारच नाही आमचं ठरलं होतं तसं माझ्या आयुष्यात इतका प्रॅक्टिकल वागणारा व्यक्ती मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. आणि असं होणार असेल तर माझ्याकडं आहेत त्यांच्या अनेक आठवणी मी सांगु का तुला? माझ्याकडे जसा मोबाईल होता त्याला तसा नविन घ्यायचा होता त्याच्याकडे दुसऱ्या कंपनीचा नवीनच मोबाईल होता मी त्याला नको घेऊ म्हणाली हवा असेल तर माझा तू घे आणि तुझा मला दे हे पण सांगितलं होतं. तुझ्याकडे जो मोबाईल आहे तो त्यांचाच आहे मी पासवर्ड पण सांगू शकते आता कळलं की तो माझ्या शब्दांबाहेर जात नसे ते. आमच्या प्रेमात बंधनं नव्हती त्यांत आदर, सन्मान आणि मुख्य म्हणजे एकमेकांच्या प्रति विश्वास होता. मी तिच्या प्रत्येक शब्दांला टिपत होतो. दरम्यान मी त्याला शोधण्यासाठी सांगण्यात आलेल्या ठिकाणी पोहचलो. हाच का तुझ्या कहाणी मधला तो? मला प्रश्न कानी पडला. त्यांचा चेहरा मला दुरुन दाखवण्यात आला, मी निःशब्द आणि आनंद गगनात मावेना ही परिस्थिती मात्र चित्र काही वेगळंच होतं. ज्याला शोधण्यासाठी साधारण अख्खी दोन वर्ष घातली कहाणीतील तो इकडं कसा आणि काय करतोय अनेक प्रश्न मनात तांडव घालत होते मात्र तो भेटल्याचा आनंद अधिक होता.

0 Comments: