विजया दशमीच्या मुहूर्तावर आधारवाडी डम्पिंग बंद होणार
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण येथील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड हा प्रशासनासाठीच नव्हे ते नागरिकांसाठी डोकेदुखी बनली होती. या विषयावर अनेक वेळेला महासभेत नगरसेवकांनी प्रशासनला धारेवर धरले होते. आता मात्र हि डोकेदुखी कायमची निघून जाणार आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांने आणि नागरिकांच्या सहकार्याने विजया दशमीच्या मुहूर्तावर आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कल्याण येथील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड दररोज ६५० मेट्रिक टन कचरा जमा होत होता. मात्र लॉकडाऊनच्या काळात पालिकेने ओला-सुका कचरा कचरा वर्गीकरण मोहीम राबविल्याने याला यश आले. त्यापैकी ४०० पेक्षा जास्त मेट्रिक टन कचऱ्याचे नागरिकांकडून वर्गीकरण होत आहे. त्यामुळे सध्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे या कचऱ्याचे स्क्रीनिग करून त्याठिकाणी पार्क चा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून विजया दशमीपासून आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.मागील ४० वर्षापासून डम्पिंगच्या दुर्गधीचा त्रास कल्याणकर सोसत आहेत. डम्पिंग बंद करण्याचे पालिकेचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनीही पालिकेला डम्पिंग वरून फटकारले आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या मोहिमेला यश आल्याने लवकरच कल्याणकारांची डमिंगच्या दुर्गंधीतून सुटका होणार आहे.घनकचरा व्य्वस्थापक रामदास कोकरे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितल कि,यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनिता राणे, नागरिकांचे सहकार्य, पालिका प्रशासनाचे अथक प्रयत्न,सर्व आरोग्य निरीक्षकांचे लक्ष आणि पत्रकारांच्या याबाबतच्या सकारात्मक बातम्या यामुळे हे शक्य होत आहे.शुणु कचरा मोहीम य्शास्वीतीत्या राबवली जात आहे.
_________________________________________________________________________________________
राज्यातील सर्व महानगरपालिकेत डम्पिंग ग्राउंड असून ओला-सुका कचर वर्गीकरण केले जाते. परंतु डम्पिंग ग्राउंड मुक्त असलेली ठाणे जिल्ह्यातील केडीएमसी ठरली पहिली महानगरपालिका ठरली आहे. याची दाखल राज्य सरकारने घेतली तरी प्रशासनाला काम करण्यास प्रोत्साहन मिळू शकेल.कचरा वर्गीकरण मोहीमेला अपेक्षित यश मिळाले आहे. तसेच डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीच्या त्रासापासून येथील स्थानिक नागरिकांचीही सुटका होणार आहे.
_________________________________________________________________________________________




0 Comments: