संघर्ष म्हणजे आयुष्याची खरी सुरुवात
( वाचक पुस्तक परीक्षण - आर. बी .पोहरकर, उल्हासनगर)
कवी नवनाथ रणखांबे यांनी 'जीवन संघर्ष' या कविता संग्रहातून कवितेत शब्द बद्ध केले आहे ते खेड्यातील जीवनमान, निसर्ग आणि पर्यावरण यांचा प्रकोप, शेतकरी आणि व्यवस्था यांचा सापसिडीचा खेळ , गरिबीची दाहकता, संघर्षातून शिक्षण घेत , आईचे स्वप्नं बाबांच्या विचाराने कवी पूर्ण करतो . समाजातील अंधश्रद्धा , भटकंती जीवन, सामाजिक गुलामगिरीची चीड, होणारे अमनुष्य सामाजिक अन्याय, व्यवस्थेची उदानसिंनता त्याच बरोबर मराठी अस्मिता यांचे दर्शन जीवन संघर्ष या पुस्तकातून घडते.
शेवटी काही ओळीत प्रेमाची बरसात होते तर त्याच बरोबर विरह सुद्धा वाचकाला रडवतो.
जीवन संघर्ष कविता संग्रहातील कविता मनाला भावतात. संघर्ष म्हणजे आयुष्याची खरी सुरुवात हे सिद्ध होते.
पुस्तक :- जीवन संघर्ष
* स्वागत मूल्य :- ८०₹*
कवी :- नवनाथ रणखांबे
प्रकाशन :- शारदा प्रकाशन ठाणे
वाचक परीक्षण :- आर. बी.पोहरकर
_______________________________________________________________________________
जीवन संघर्ष पुस्तकात नवनाथ रणखांबे यांनीआयुष्यातील नमस्कार... मी वृषाली संघर्षाबद्दल लिहिले आहे
( पुस्तक अभिप्राय :-वृषाली अर्जुन गायकवाड)
नमस्कार... मी वृषाली अर्जुन गायकवाड. मी नवनाथ रणखांबे सरांचे जीवन संघर्ष पुस्तक वाचले. खरंतर जीवन संघर्ष या पुस्तकामध्ये त्यांनी आयुष्यातील संघर्षाबद्दल लिहलं आहे. प्रत्येक कविता ही त्यांनी केलेले संघर्ष आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभे करुन दाखवते. इतकंच नाही प्रत्येक कवितांमध्ये एक अर्थ आहे. मग ते आई बद्दलचे प्रेम आहे, बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेले कार्य आहे, माया आहे, जिव्हाऴा आहे.
मी, जेव्हा कविता वाचत होती. तेव्हा त्यांना प्रत्यक्ष समोर बघत होती. खरंच सरांनी खुप छान त्यांनी त्यांचे आयुष्य किंवा जिवनातील अनुभव कमी शब्दांत पण प्रत्येकांपर्यंत पोहचवलं आहे. त्यांनी कविता ही स्वत:च्या अनुभवांवरुन किंवा स्वत:च्या परिस्थितीवरुन लिहिलेली आहे. कदाचित त्यांना मन मोकळे करण्यासाठी जीवन संघर्ष हे कवितेच्या रुपाने साधन मिळाले असावे. त्यांच्या प्रत्येक कवितेतील प्रत्येक ओळीला एक स्वतंत्र अर्थ आहे.
आता हेच बघा ना ह्या कवितेतील ओळींना खुप छान अर्थ आहे. समजुन घेतले तर मजेशिर आणि प्रत्यक्ष अनुभवले तर मनाला लागेल असे.
शहाने झाले वेडे... वेड्यांनी खाल्ले पेढे
मानापानाचे वेडे ... मान घ्यायला पुढे
पैश्याने घेतला मान
मानाची कापली मान....
मानाची गेली शान
असे किती दिवस चालायचं...?
शहाने झाले वेडे... वेड्यांनी खाल्ले पेढे
मानापानाचे वेडे ... मान घ्यायला पुढे.. या ओळींमध्ये थोडक्यात पण खुप काही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याचा अर्थ मी एका उदाहरणाने सांगते की रमेश हा दहावीमध्ये शिकत आहे. त्याला सर्वच अभ्यास कर म्हणुन सांगत असतात पण खरे मार्गदर्शन त्याच्या शिक्षकांनी त्याला केले आणि रमेश बिचा-याने दिवसातुन जास्तीत जास्त वेळ बसुन अभ्यास केले. रमेशची परिक्षा झाली आणि निकाल लागल्यानंतर रमेश 95% उत्तीर्ण झाला. रमेश काही स्वत:ची स्तुती करेना पण रमेशला भेटायला कोणी आलेच तर रमेशचे शेजारी पुढे येऊन हा काय अभ्यास करत नव्हता आम्हीच त्याला सारखे रमेश अभ्यास कर, अभ्यास कर म्हणुन सांगायचो म्हणुन तर इतके गुण मिळाले. नाहीतर कधी पण बाहेरच असायचा... म्हणजेच याचाच अर्थ असा की रमेशने अभ्यास केला, चांगले गुण मिळवले पण ते आमच्यामुळे हे सांगणारे वेगळेच होते.
अशाप्रकारे सरांच्या प्रत्येक ओळीला एक वेगळाच अर्थ आहे. कदाचित काही प्रसंग आपल्या ही आयुष्यात घडलेले असतात. पण काहींना व्यक्त होता येत नाही. सरांनी खुप छान प्रकारे काव्यामध्ये वर्णन केले आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या विषयांना त्यांनी काव्यातुन व्यक्त केले आहे.
पुस्तक -: जीवन संघर्ष
कवी -: नवनाथ रणखांबे
प्रकाशन -: शारदा प्रकाशन ठाणे
वाचक परीक्षण -: वृषाली अर्जुन गायकवाड





👍
ReplyDelete