कोरोना संकट दूर होण्यासाठी एकता नगरमधील नवरात्रोत्सवात सामुहिक प्रार्थना
डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील पूर्वेकडील खंबाळपाडा भागातील एकता नगरमध्ये अनेक वर्षापासून मोठ्या भक्तिभावाने नवरात्रोत्सव साजरा केला जातो.यात विविध धर्मियांच्या वतीने राष्ट्रीय एकात्मतेचे घडविणारा नवरात्रोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. मोर्य मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवात एकता नगरमधील विविध धर्म, जात पंथातील नागरिक एकत्र येऊन आरती करतात.यावर्षीचे कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी एकता नगरमधील नवरात्रोत्सवात सामुहिक प्रार्थना करण्यात आली.यावेळी कॉंग्रेस सेवा दल डोंबिवली पूर्व शहर अध्यक्ष समशेर खान यासंह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्य मित्र मंडळाचे हे चौथे वर्ष आहे.यंदा करोनामुळे दांडिया खेळण्यास मनाई असली तरी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून देवीची यथासांग आरती, पूजा, गाणी , विविध खेळ, मनोरंजनाच्या माध्यमातून देवीचा उत्सव साजरा केला जात आहे.एकता नगरमधील या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे या देवीचे डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे.याबाबत रंजक कहाणी सांगताना स्थानिक रहिवासी कमलाकर जयस्वाल म्हणाले, उत्तर प्रदेशात गोंडा येथे अशी प्रथा आहे कि, नवरात्र उत्सवात देवीची प्रतिष्ठापना करते समयी देवीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. हि पट्टी पंचमीला(पाचव्या दिवशी) काढली जाते.पट्टी काढते समयी पैशाची बोली लावली जाते.ज्या भक्ताची जास्त बोली त्यास पट्टी काढण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि देवीच्या आरतीपासून ते पूजेचे सर्व साहित्य हा भक्त देत असतो.तर समशेर खान यांनी जगातून कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे अशी देवी चरणी प्रार्थना केली.




0 Comments: