कविता : हेच तर जीवन आहे...
धेयाच्या दिशेने
वाटचाल करित राहणं
न थकता, न कंटाळता
हरल्यावरही पुन्हा लढा उभारणं
प्रामाणिक कष्ट
सन्मार्गावर निष्ठा
जीवनावर विलक्षण प्रेम
व प्रयत्नांची पराकाष्ठा
हेच तर जीवन आहे... || 1 ||
पडलेल्यांना उठवणं
हरलेल्यांना धिर देणं
सत्कार्यात मदतीचा हात
समाजहितासाठी अविरत राबणं
व्याकुळ झालेल्यांना हसवणं
विलग झालेल्यांना एकत्र आणणं
सभोवार आनंद पसरवताना
अनाथांनाही कवेत घेणं
हेच तर जीवन आहे... || 2 ||
भुकेलेल्याला अन्न
तहानलेल्याला पाणी
आकाशाखाली विसावलेल्यांना
छोटसं छत देणं
खचलेल्यांना आत्मविश्वासी बनवणं
आसुसलेल्यांना थोडा जिव्हाळा
वाट चुकलेल्यांना सन्मार्ग
व आनंदोत्सव नित्य साजरा करणं
हेच तर जीवन आहे... || 3 ||
______________________________________
✍️ *मनोहर साळुंके, कल्याण*




0 Comments: