महिला लोहमार्ग पोलिस प्रियांका भोगावकर यांची कौतुकास्पद कामगिरी..!!
पत्रकार : प्रविण बेटकर
डोंबिवली (ठाणे)
दादर रेल्वे स्थानकात दि. २७ रोजी १५. ४५ वा. च्या सुमारास प्लॅटफॉर्म नं -४ वरील एका बाकड्यावर अज्ञात व्यक्ती आपली राखाडी रंगाची खांद्याला अडकवण्याची पर्स विसरून मुंबईकडून येणारी डाऊन लोकल पकडून निघून गेली. सदर प्लॅटफॉर्मवर गस्तीचे काम करीत असलेल्या महिला पोलिस (WPC/ 129) प्रियांका भोगावकार यांना गस्ती दरम्यान ती पर्स निदर्शनास आली. त्यांनी ती पर्स दादर पोलिस ठाण्यात अंमलदार यांच्याकडे जमा करून तपास केल्यास त्यामध्ये रोख रुपये व महत्वाचे कागदपत्रे सापडली असता मिळालेल्या माहितीवरून महिला प्रवासी स्वाती शेलार, ३०- वर्षे, (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) रा. ठाणे यांच्याशी संपर्क करून त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून ती पर्स त्यांचीच असल्याचे खात्री करून त्यांना देण्यात आली. यावेळी दादर रेल्वे पोलिस ठाण्याचे व. पो. नि. प्रसाद पांढरे साहेब उपस्थित होते. त्याबाबत नमूद महिला प्रवासी यांनी पोलिस प्रियांका भोगावकार यांच्या कामगिरीचे कौतुक करून दादर पोलिस ठाण्याचे आभार व्यक्त केले.

0 Comments: