ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा
डोंबिवली ( शंकर जाधव ) बहिणाबाई साहित्य संस्था(परिषद) आणि आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी काव्यमहोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा व ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. आपली कविता वा वक्तृत्व आपल्या घरीच मोबाईल वर किंवा कॅमेऱ्यावर शूट करून पाठवायचे आहे. कविता वाचन वा वक्तृत्व स्पर्धेमध्ये सादरीकरण करताना प्रथम स्वतःचे नाव व नंतर कविता वा वक्तृत्व स्पर्धा विषयाचे नाव सांगावे.त्यानंतर *बहिणाबाई साहित्य संस्था आणि आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांचा उल्लेख करून मग काव्यवाचनास वा भाषणास सुरुवात करावी. कृपया स्वतः चा परिचय वा पार्श्वभूमी सांगू नये वा कोणतेही निवेदन करू नये. व्हिडीओ तयार करताना त्यामध्ये कोणतेही संगीत/ मुझिक वापरू नये वा कोणतेही स्पेशल इफेक्ट देऊ नये. गट क्रमांक १ व गट क्रमांक २ साठी विद्यार्थ्यांनी बहिणाबाई चौधरी यांची कविता सादर करायची आहे. तसेच गट क्रमांक ३ खुला गट यामध्ये कवींनी स्वरचित कविता सादर करावयाची आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी खालील विषय आहेत. गट क्रमांक १ व गट क्रमांक २ साठी `माझा आवडता कवी` व `माझे आवडते पुस्तक`,गट क्रमांक ३ साठी `मला आवडणारी बहिणाबाईंची कविता किंवा बहिणाबाईंची गाणी` आणि `जीवन तत्वज्ञान` यापैकी कोणत्याही एका विषयावर बोलायचे आहे. कविता स्पर्धेसाठी कमाल वेळ मर्यादा ५ मिनिटे व वक्तृत्व स्पर्धेसाठी वेळ मर्यादा १० मिनिटे असणार आहे. आपला व्हिडिओ आपण १५ ऑक्टोंबर २०२० रात्री १२ पर्यंत खालील क्रमांकावर पाठवावा. व्हिडिओ २० ते २५ ऑक्टोबर दरम्यान अपलोड करण्यात येईल व आपल्याला त्याची लिंक पाठविण्यात येईल. आपला कवितेचा वा वक्तृत्व स्पर्धेचा व्हिडिओ या आधी कोठेही प्रसारित झालेला नसावा. त्यानंतर त्या व्हिडिओ ला १० नोव्हेंबर २०२० रात्री १२ पर्यंत मिळणारे लाईक, व्ह्यूज आणि सबस्क्राईब व परीक्षकांच्या (५०% + ५०%) गुणांवरून निकाल जाहीर करण्यात येईल. दोन्ही स्पर्धांसाठी वेगवेगळ्या प्रवेशिका पाठवाव्यात. दोन्ही स्पर्धांसाठी गट १ इयत्ता ३ री ते ६ वी, गट २ इयत्ता ७ वी ते १० वी,गट ३ खुला गट आहेत.प्रत्येक गटासाठी व प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम , द्वितीय , तृतीय व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात येतील. पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र आणि पुस्तक स्वरूपात भेटवस्तू प्रदान करण्यात येतील. सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. पारितोषिक वितरण समारंभ डिसेंबर मध्ये आयोजित करण्यात येईल. ( ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यावेळी असलेल्या सरकारी आदेशानुसार) आपल्या कविता व वक्तृत्व स्पर्धा प्रवेशिक हेमंत नेहते 8779644992 किंवा लिलाधर महाजन 9867249718 या क्रमांकावर पाठवाव्यात.




0 Comments: