कविता : कोरोना लस
लस येण्याआधी त्यांचा नुसताच गाजावाजा
लस बनवणारा म्हणे मीच पहिला राजा
लस मिळाली नाही म्हणून त्याने लसूण रोज खाल्ली
कोरोना बागूल बुवाची त्याने उडवलीच खिल्ली
चमचाभर सँनिटायझर तळहातावर आले
भोलारामने तीर्थ समजून भक्तीने प्राशन केले
तीर्थ घेतले सत्यनारायण प्रसाद नाही काय
कोरोनारायणकी जय म्हणत मास्क लावून जाय
पीपीई किट घालून त्यांनी दरोडे घातले
सीसीटीव्ही फुटेज मध्ये डॉक्टरच वाटले
घसा झाला कोरडा तळीराम कासावीस झाले
दारू दुकाने बंद म्हणून सँनिटायझर प्याले
डीस्टन्स ठेवून लग्न झाले मधु मीलनाचे काय
डिस्टन्स गेला खड्यात आता कोणाची पर्वा नाय
काम नाही धंदा आणि घरात रहा घरात रहा
उतावळा नवरा म्हणतो लाडके रात्रंदिवस जवळच रहा
बायकोने पीएमला पाठवले पत्र
लाँकडाऊन उठवा नवरा सतावतो दिवस रात्र
बनारसी पान खाऊन मास्क लावला तोंडाला
तोंड भरून आले म्हणून त्यातच पचकन थुंकला
मास्क रोज लावून महिन्यात पंधरा हजार कमावले
दंडाची रक्कम स्वतःच्या तिजोरीत टाकले
ऊन्हामध्ये तापून माणूस दवाखान्यात आला
डॉक्टर म्हणाले त्याला कोरोना रोग झाला
पेशंटला तपासायला डॉक्टर बसला दहा फूटांवर
स्टेथाँस्कोपला लावली केबलची वायर
पेशंटला ईंजेक्शन द्यायला अजब युक्ती काढली
ईंजेक्शन आणि सुई धनुष्यालाच लावली
ज्यांना कोरोना झाला ते पुढारी आणि कलाकार
ज्यांना झाला नाही ते फालतू आणि बेकार
कल्पनेतला कोरोना चायना मधून पळाला
कुत्र्यांच्या मटणावर त्यांनी मस्त ताव मारला
तळीराम झिंगत झिंगत छाती ठोकून म्हणाला
दारूमुळेच माझ्यातला कोरोना खलास झाला
अनेक तास तोंडावरचा मास्क नाही काढला
श्वास कोंडून त्याला यमराज घेऊन गेला
कोरोना काळातला म्रूतात्मा कावळा होऊन आला
कसा शिवू पिंडाला डिस्टन्स पाळायचे मला
बुद्धी झाली लाँकडाऊन गणरायांना पडला प्रश्न
कोरोना म्हणजे कल्पना कसे करू दूर विघ्न
आले सण गेले सण ध्यानी मनी फक्त कोरोना
काळूबाईच्या नावानं चांगभलं यापुढे फक्त डरोना
अशोक सावंत फुलवतो वास्तवाचे निखारे
कोरोना रोग झाला सांगून आता त्याला संपवारे
कवी : अशोक सावंत ( वाँट्सँप नंबर - 9324558492)
माहूल ;




0 Comments: