संडे फंडे
आठवड्याचे दिवस सात
विचारात पडतो आपण
की ह्यावर
कशी करायची मात
सोमवारी ऑफिसला जायला येतो कंटाळा
आई बोलते
उठ रे लवकर
ऑफिसला लेट होईल ना बाळा
पोचताच ऑफिसला मेल्सने भरलेला
दिसतो इनबॉक्स
असं वाटतं ह्या पेक्षा कधी मी कंप्लीट
करतो लंचबाॅक्स
आतुरता असते फक्त
त्या दिवसाची
ज्याला म्हणतात संडे
तोच असतो खरा आठवड्याचा फंडे
एरवी कामा शिवाय
नसतो आपल्याला कशालाच वेळ
पण ह्या दिवशी असतो
सकाळपासून वेळच वेळ
दिवस उजाडताच आनंदाने
कधी मावळतो कळत नाही
आणि हा संडे गेला की
आम्हाला चैन पडत नाही
हीच तर गंमत आहे ह्या फंडेची
इतर दिवशी येते
फक्त गोड आठवण
ह्या संडेची !!
सागर प्रफुल्ल म्हात्रे
०२/१०/२०२०





0 Comments: