पथविक्रेता नोंदणीसाठी आलेल्या फेरीवाल्यांकडून सोशल डिस्टसिंगचा फज्जा

पथविक्रेता नोंदणीसाठी आलेल्या फेरीवाल्यांकडून सोशल डिस्टसिंगचा फज्जा

 पथविक्रेता नोंदणीसाठी आलेल्या फेरीवाल्यांकडून सोशल डिस्टसिंगचा फज्जा


              पालिका प्रशासनाची बघ्याची भूमिका

 डोंबिवली : ( शंकर जाधव ) कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते.त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून राज्य सरकारने अनलॉकच्या दिशेने पाऊन टाकले आहे. हळूहळू जनजीवन सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली आहे.आपली महत्वाची कामे करताना शासनाच्या नियानाचे पालन करणे अत्यावश्यक आहे.मात्र केडीएमसीत या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे. डोंबिवली पूर्वेकडील पालिकेच्या विभागीय कार्यालयातील `ग` प्रभाग क्षेत्र हद्दीतील पथविक्रेत्यांची नोंदणी सुरु आहे.परंतु पथविक्रेता नोंदणीसाठी आलेल्या फेरीवाल्यांकडून सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडला आहे.या प्रकाराकडे पालिका प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या कमी होणार कि नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील पालिकेच्या विभागीय कार्यालयातील `ग` प्रभाग क्षेत्र हद्दीतील पथविक्रेत्यांची नोंदणी सुरु आहे.नोंदणी करण्याचे काम सायबर कॅफे चालवणाऱ्यांना देण्यात आले आहे. नोंदणी करताना फेरीवाले सोशल डिस्टसिंगचे पालन करत नसल्याचे दिसत असूनही त्यांना तश्या प्रकरच्या सूचनाही दिला जात नाही. एवढेच नव्हे तर नोदणी करणारेही या नियमांचे पालन करत नाही.त्यावर पालिका प्रशासनाचा अंकुश नसल्याने नागरिकांना नियम सांगणारे प्रशासनला आपल्या कार्यालयात नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येते.याठिकाणी फेरीवाला पथक प्रमुख नेहमी फेरी मारत असून त्यांनीही या प्रकाराकडे कानाडोळा केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

0 Comments: