अंकुर सामाजिक केंद्रातील १२ मुलांची बचत खाती उघडली...

अंकुर सामाजिक केंद्रातील १२ मुलांची बचत खाती उघडली...

 अंकुर सामाजिक केंद्रातील १२ मुलांची बचत खाती उघडली...




डोंबिवली ( शंकर  जाधव ) आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व सक्षम होण्याच्या विचाराने अंकुर बालविकास केंद्रटिटवाळा येथे 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या वतीने संस्थेतील १० वर्षांपुढील १२ मुलांची बचत खाती उघडण्यात आली. यासाठी झोनल ऑफिसमधून सविता पावसकर तर टिटवाळा शाखेतून शिला सावंत यांनी मार्गदर्शन केले. संस्थेतील मुलांना त्यांचा आर्थिक व्यवहार सुरळित होण्यासाठी संस्थापिका अक्षदा भोसले यांनी हा उपक्रम राबवला. या उपक्रमासाठी 'बँक ऑफ महाराष्ट्र व सविता पावसकरशिला सावंत यांचे आम्ही सदैव ऋणी राहू असे भोसले म्हणाल्या.या केंद्रात २५ मुले असून ही मुले ज्यावेळी बाहेरच्या जगात आपले करियर करण्याचा प्रयत्न करतील त्यावेळी मुलांना याचा आधार मिळेल असेही भोसले यांनी सांगितले. बेघर व गरजू मुले या केंद्रात रहात असून त्यांचे पालन-पोषण आणि शिक्षणाची जबाबदारी सदर केंद्राने घेतली आहे.शून्य बॅनल्सवर बँक खाती जरी उघडली असली तरी या खात्यात केंद्र त्याच्या परीने जेवढे जमेल तेवढी आर्थिक मदत या खात्यात त्या मुलांच्या नावे जमा करणार आहेत. ज्या दानशूर व्यक्तीं, सामाजिक संघटना यांना या मुलांना आर्थिक मदत करावयाची असल्यास त्यांनी अक्षदा भोसले ८६५२२८४८८८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

0 Comments: