रेल्वे कँटीनच्या इमारतीच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या भरणी मध्ये आढळला मृतदेह

रेल्वे कँटीनच्या इमारतीच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या भरणी मध्ये आढळला मृतदेह

रेल्वे कँटीनच्या इमारतीच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या भरणी मध्ये आढळला मृतदेह

हत्या करून मृतदेह पुरल्याचा संशय 
डोंबिवली ( शंकर जाधव)  रेल्वे कॅन्टीनची इमारत उभारण्यासाठी जमीनिवर भरणींचे काम सुरू असताना  जमिनीखाली पुरलेला मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना कल्याण वालधुनी परिसरात उघडकीस आली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. 
    कल्याण रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या वालधुनी परिसरात जमिनीखाली पुरलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. रेल्वेकडून कॅन्टीनसाठी इमारत उभारण्याचे काम सुरू असून याठिकाणी शनिवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास भरणीचे काम सुरू असताना मृतदेह आढळला. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदर इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी सदरचा मृतदेह पुरल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असून याप्रकरणी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे सहययक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी सांगितले.

0 Comments: