कविता : सांग देवा
अवघ्या जगाला
कोरोनाची झळ
आनंद हरपला
अंगी नाही बळ...।।१।।
मास्क तोंडाला
हाती सॅनिटायझर
कैसे मारावे? विषाणूला
नाही प्रश्नास उत्तर..।।२।।
विसाव्या या वर्षाला
कोरोनाचे ग्रहण
लसीच्या प्रयत्नाला
लाभू दे सुदिन..।।३।।
नाही दया देवाला
देऊळे झाली बंद!
मृत्यू घाली घाला
सरण शल्ल्यात धुंद..।।४।।
चीनने खेळ मांडला
जग भोगे भोग,
सांग देवा आज मला
कधी येईल तुला जाग..।।५।।
कवी:- श्री सूर्यकांत शंकर आंगणे
ताडदेव मुंबई-34
मो.क्र :- 8104062950




0 Comments: