धाव गजानना (गीत)
भक्तपालका धाव गजानना
आलो शरण तुझ्या रे चरणा ||धृ.||
कोरोनावरी करीत रे मात
प्रेमे भावे करु तुझे स्वागत
झालो जरी महामारीने त्रस्त
कैक आपदे झेलू रे जीवना
आलो शरण तुझ्या रे चरणा
भक्तपालका धाव गजानना ||१||
आरती करिता वाजवू टाळ
द्यावे निरंतर आम्हा तू बळ
जुळुनी यावी तुझ्या सवे नाळ
निशीदिनी उरी हीच कामना
आलो शरण तुझ्या रे चरणा
भक्तपालका धाव गजानना।।२।।
तुलाच ज्ञात कोरोनाचा अस्त
राहू तोवरी रे भजनी व्यस्त
विनंती करी कवी सूर्यकांत
सांग का? छळीतो काळ हा जना
आलो शरण तुझ्या रे चरणा
भक्तपालका धाव गजानना ||३||
गीतकार :- सूर्यकांत आंगणे
ताडदेव बने कंपाउंड
मुंबई ४०००३४
भ्रमणध्वनी क्रमांक : ८१०४०६२९५





0 Comments: