ठाकुर्लीतील पतपेढीमध्ये व्यवस्थापकाची आत्महत्या

ठाकुर्लीतील पतपेढीमध्ये व्यवस्थापकाची आत्महत्या

 ठाकुर्लीतील पतपेढीमध्ये व्यवस्थापकाची आत्महत्या

 डोंबिवली : ( शंकर जाधव ) डोंबिवली श्हाराजवळील ठाकुर्ली येथील सहकार मित्र मधुकर सहकारी पतपेढी मध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास व्यवस्थापकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. कामावर आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी पतपेढीत प्रवेश केल्यावर व्यवस्थापकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याला कळविले.पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून  पोलिसांना पतपेढीत एक चिठ्ठी सापडली आहे.

    पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश हरिभाऊ आरोपे ( ४४ ) असे आत्महत्या करणाऱ्या व्यवस्थापकाचे नाव आहे. ठाकुर्ली येथील हनुमान मंदिराजवळील नवनंदा इमारतीतील योगेश हे ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर असलेल्या सहकार मित्र मधुकर सहकारी पतपेढीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते.शनिवारी सकाळी कर्मचाऱ्यांना योगेश यांचा मृतदेह गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून `मी आत्महत्या करत असून कोणालाही दोषी ठरवू नये`असे लिहिले आहे.या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर घाडगे पुढील तपास करत आहेत.    

0 Comments: