प्रवाश्यांसाठी तक्रार नोंदविण्याचे ठाणे जिल्ह्यातील पहिले `पाम`मोबाईल अँप
रिक्षाचालकांची अरेरावी,जादा रिक्षा भाडे आकारणी, भाडे नाकरणे,विनाकारण प्रवाश्यांशी वाद घालणे या व अश्या यासारख्या अनेक प्रश्नावर उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस विभागाकडे लेखी तक्रारी येतात.मात्र त्यावर लवकर निवारण होत नसल्याने प्रवाशीवर्गात नाराजी पसरली आहे. यावर तोडगा काढत प्रोटेस्ट अगेस्ट आॅटोवाला मंचच्या वतीने`पाम`मोबाईल अॅप प्रवाश्यांसाठी बनविण्याचे ठरवले. डोंबिवलीतील सामान्य प्रवाश्यांनि एकत्र येऊन प्रवाश्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी प्रोटेस्ट अगेस्ट आॅटोवाला मंचची स्थापना झाली. संघटनेचे `पाम`मोबाईल अॅप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.मंचाचे सभासद प्रमोद केणे,सचिव गवळी,प्रसाद आपटे,सागर घोने, विशाल नलावडे, अल्पा खोना आणि निखील माने यांनी मंचाच्या स्थापणेपासून प्रवाश्यांच्या समस्येवर आवाज उठवला आहे.या अॅप मध्ये अत्यंत सोप्या भाषेत प्रवाश्यांनी आपल्या तक्रारी नोंदविण्याचे सोय आहे.या अॅपवर आपल्या भेडसावत असलेल्या समस्येवर टिक करायची आहे. या अॅपवर तक्रार केल्यावर ती तक्रार उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस विभागाकडे जाते.याबाबत अधिक माहिती देताना सचिन गवळी म्हणाले,डोंबिवलीकरांना अश्या प्रकारच्या अॅपची गरज होती.यावर मंचच्या सदस्यांबरोबर चर्चा करून अॅप बनविण्याचा निर्णय घेण्यात आला.या अॅपवर प्रवाश्यांनी नोंदविलेल्या तक्रारीवर उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस विभागाने काय कारवाई केली याबाबत विचारणा केली जाईल.प्रत्येक तक्रारीचे निवारण तत्काळ होणार नाही. त्यासाठी काही अवधी लागणार आहे.आतापर्यत ४० प्रवाश्यांनी हा अॅप डाऊनलोड केला आहे.





0 Comments: