🌹 कविता : घर 🌹
🏠🏡🏡🏘🏘🏘🏘
गावाकडील लाल मातीवर
उभं माझं कौलारु घर 🏡
झाडांचं कुंपण घराच्या सभोवार
कुंपणात पडत चांदण टपोर
वर्षातून होते एकदा घराशी भेट
तेव्हा घर मला घेते कुशीत थेट,
मी घराचा आणि घर माझ होतं
अवचित कसं आमुचं नात जुळतं ,
घराच कौतुक ओठात व मनात
माझ्यावर प्रेम, घर माझं करत
दोघांचं ही कस अवलोकन सूक्ष्म
आज जरि मला आलंय वृधत्व
तरी ही ह्रुदयात आहे घराच ममत्व
घर आणि मी नाण्याच्या बाजू दोन
घर असेल कुटुंब असेल पण मी नसेन
तेव्हा मात्र घर जपेल माझी आठवण..
तेव्हा मात्र घर जपेल माझी आठवण..
🏘🏘🏘🏘🏘🏘🏘🏘🏘
- कवी श्री सूर्यकांत शंकर आंगणे
ताडदेव बने कंपाऊंड
सानेगुरुजी मार्ग मुंबई - 400034
मो.नं. 8104062950




0 Comments: