राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी सतत प्रयत्नशिल राहणार
- प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे
अहमदनगर (प्रतिनिधी )
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा सर्व समावेशक पक्ष आहे, या पक्ष्यांमधे सर्व जाती धर्माचे लोक समाविष्ट आहेत, या पक्ष्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही,व केला जाणार नाही,राजकारण करणे हा माझा पिंड नाही, परंतु या पक्ष्याची ध्येय धोरणे मला योग्य वाटली म्हणून मी हा पक्ष प्रवेश केला आहे, असे प्रतिपादन प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे यांनी केले,नाशिक येथील वसंत मार्केट येथील समर्थ बॅकवेट हॉलमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या राज्य केंद्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली, अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे हे होते, आपल्या भाषणात पुढे, प्रा ,बनसोडे म्हणाले की , या राष्ट्रीय पक्ष्याच्या विसताराकरिता आमचे मार्गदर्शक श्री अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली व पक्ष्यतील माझ्या सर्व जेष्ठ सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आटोकाट प्रयत्न करीत राहणार आहे, मला पदाची अपेक्षा नाही, नुसते पद घेऊन मी मिरवणाऱ् नाही, तर फक्त पक्ष कसा वाढीस लागेल हाच माझा ध्यास राहनार आहे,राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा माझा ध्यास तर आहेच ,पण शेवटी पर्यंत माझा श्वास राहणार आहे, मी पद मिळाले म्हणून काम करीत नाही, तर माझ्या अंत:करणापासूनच मी हे काम करणार आहे,,थोडक्यात कोणी निंदा अथवा वंदा, पक्ष वाढीकरिता प्रयत्न करणे हाच माझा धंदा असे ही प्रा, बनसोडे आपल्या भाषणात म्हणाले, या वेळी उपस्थित सर्व कार्यकार्यत्यानी आपले विचार मांडले, व पक्ष वाढीकरिता प्रयन्त करणार असल्याचे अभिवचन दिले,, यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते उपस्थित होते, राष्ट्रीय अध्यक्ष अण्णा साहेब कटारे यांनी देखील कार्यकर्त्याना मोलाचे मार्गदर्शन केले , राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश अकोलकर , यांचे सह सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रा,ज्ञानेश्वर बनसोडे यांनी पुढे आपल्या भाषणात म्हणाले की ,या पक्ष्यतील सर्व कार्यकर्ते,हे एकनिष्ठ आहेत, आणि शेवट पर्यंत एकनिष्ठ राहतील असाही विश्वास त्यांनी या वेळी वेकत केला,सदर, राज्य केंद्रीय कार्यकारीनिच्या नाशिक येथील बैठकीस सर्व थरातून कार्यकर्ते उपस्थित होते, अतिशय आनंददायी वातावरणात ही वैचारिक बैठक पार पडली आहे







0 Comments: