फटाकेमुक्त दिवाळी अभियान उत्साहात संपन्न

फटाकेमुक्त दिवाळी अभियान उत्साहात संपन्न

 फटाकेमुक्त दिवाळी अभियान उत्साहात संपन्न


(मुंबई प्रतिनिधी )

दिवाळी म्हनजे उत्सवाचा, आनंदाचा  सण. आकाशकंदील, पणत्या , रांगोळी , फराळ 

नवीन कपडे , गाठीभेटी म्हणजे  दिवाळी आणि याच दरम्यान होते  फटाक्यांची आतिषबाजी.पूर्वी  हे प्रमाण खूप कमी होते पण आता वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्या आकाराचे,  आवाजाचे ,  प्रकाशाचे  फटाके बाजारात येवू  लागले आणि यामुळे  वायू प्रदूषण,  ध्वनी प्रदूषण,  अपघात,  म्रुत्यु यांचे प्रमाण  वाढले.शालेय विद्यार्थ्यांना  याबाबत योग्य ती  माहिती देण्यासाठी फटाकेमुक्त अभियान हे प्रभावी ठरते आहे 

प्रा.प्रदीप  कासुर्डे सर यांच्यावतीने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.यावर्षी ऑनलाईन रीतीने तीन विविध  ठिकाणी या  कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.श्री सरस्वती विद्या मंदिर भांडूप ,इंनटीलिज्न्स क्लासेस  पोवई , एस.एस .क्लासेस कुर्ला  या ठिकाणी ऑनलाईन फटाकेमुक्त अभियानाचे  आयोजन करण्यात आले होते  .यात प्रदीप कासुर्डे सरांनी विविध स्लाइड  द्वारे फटाके  फायदे,तोटे , दुष्परिणाम,फटाक्यामुळे  होणार प्रदूषण, अपघात,होणारी वित्त व जीवित हानी, बालमजुरी इत्यादी  मुद्दे साध्यासोप्या व संवादी पदधतीने समजावून सांगितले.आम्ही फटाके कमीत कमी वापरून उरलेल्या पैशातून पुस्तके , किल्ले साहित्य, भेटी वस्तू,ग्रेटीग कार्ड,यावर खर्च करू अशाप्रकारे  संकल्परुपी प्रतिज्ञा घेतली 

या अभियानात  जवळजवळ  200 विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला असून श्री लिलाधर महाजन सर , प्रा.संगीता मोरे मँडम  यांचे ही सहकार्य लाभले आहे 

प्रा प्रदीप कासुर्ड सर हा उपक्रम दरवर्षी राबवत असून इतरही विविध साहित्यिक , शैक्षणिक , सामाजिक उपक्रम राबवत  असतात.त्यामुळे चला आपण सर्व मिळून फटाकेमुक्त , प्रदूषणमुक्त , इकोफ्रेंडली दिवाळी साजरी करूया.'

1 comment

  1. धन्यवाद संपादक साहेब

    ReplyDelete