कविता: कोरोना तू जा ना

कविता: कोरोना तू जा ना

 कोरोना तू जा ना (कविता)


जग एकविसाव्या शतकाकडे

वाटचाल करित असताना

कोरोनारुपी असुर भूतलावर अवतरेल

हाडामांसाच्या माणसांना

एक एक करून गिळंकृत करेल

असं कधी वाटल न्हवत

किंबहुना स्वप्न सुद्धा पडलं न्हवत

आज जगभर जिवंत वावरतोय कोरोना

मन अस्वस्थपणे पाहतेय त्याचा धिंगाणा

मनाचे डोळे उघडे आहेत पण सर्वत्र अंधार

कोण कधी केव्हा संपवणार कोरोनाचा कारभार

दिल्लीत थंडीत बळावलाय कोरोना

जीव मुठीत धरून वावरतोय घरादाराचा कोना

मुंबईत त्याने पुन्हा येऊ नये ही अंतरी भावना

पुन्हा लॉकडाऊनचे सावट नको मरणप्राय यातना

नतमस्तक होतो चरणा कोरोना तू जा ना जा ना



कवी श्री. सूर्यकांत शंकर आंगणे

ताडदेव, मुंबई ४०० ०३४.

भ्रमणध्वनी ८१०४०६२९५०

0 Comments: