भारीतले सुख
मी म्हणालो, होतो सध्या एकत्र राहुया
होतोय येवढा तेवढा त्रास तो सोबत सहुया..
पण तुझी रोजची पिरपिर, रोजची किरकिर
का पाहाते वेगळे व्हायायचे भारीतले सुख...
घरातील सदस्यांची मोजायची नसते संख्या
सुखा दुःखात नबोलवता हा गोतावळा कसा होतो जमा
याचे कधी मापले का तु माप
मग का पाहाते वेगळे व्हायायचे भारीतले सुख....
आई आणि बाबा नेहमी येतील तुला कामी
दादा आणी ताईची वहिनी तु भारी
वहीणीच्या मुलांचे तर तु विचारच नको करु,
पण का पाहाते वेगळे व्हायायचे भारीतले सुख...
सासरेबुवा होते माझे हुशार,
घरातल्या सदस्याचा होईल तुला आधार
पाहुणे रावळेचा सदाच येवा जावा राहील
राधणे पदणेत होईल तुला आधार
घराला नको म्हणूस नुसता बाजार
का पाहाते वेगळे व्हायायचे भारीतले सुख..
भावजाईची चुगली,खोडी काढली म्हणून का दुरावते दादांची आवू म्हणून नंनद नेहमी गावभर मिरवते
सास-यांना एकदा बाबात बघ
जावूत बहीनीचे प्रेम मिळते का सोधून बघ
का पाहाते वेगळे व्हायायचे भारीतले सुख...
दोघां राजा राणीचा संसार
दोघांत तिसरा येईलच
वाचने-लिहीणे फिरणे-हिंडणे नटने-मुरळणे महीण्यालासाडी ऊन ऊन खिचडीवर तुपच काय
पण दुधावरची मिळणार तुला नाय साय
मग का पाहाते वेगळे व्हायायचे भारीतले सुख....
तुझे रडणे नको ती रोजची किरकिर पिरपिर
नको तुझा अबोला म्हणून मी संसार बाजूला मांडला आई,बाबा,दादा याचा मी राग माझ्यावर काढला
आता कर संसार एकट्याने तु
मग कळून चुकेल तुला वेगळे व्हायायचे भारीतले सुख.....
आईची आठवण तुला वेळोवेळी येईल
छोट्या ताईची खंत तुझ्या मनाला खाईल
जावूबाई कामात हातभार लावत होत्या
त्याची तुला कळून येईल प्रित
मग कळेल तुला वेगळे व्हायायचे भारीतले सुख.....
सा-यानमिता पगार ही आपल्याला पुरत होता
महीण्याला साडी तरी मिळत होती
हवूस महुस तरी तुझी भागत होती
आता कसली हवूस आणी कसले मवूस
तांदूळ घरात आला तर गहू होतो पसार
बाळ रडाला तर तु होते बेजार
नव-याने पाणी मागीतले तर दाखवते पाण्याचा माठ
राजा राणीतला राजा कुठे हरवला दिसत नाही
वेगळी व्हायची तुझी हवूस आजू कशी फिटत नाही
ऐक तु माझे,
अजूनही वेळ गेली नाही
संसारात लागते भांड्याला भांडे त्याच्यात हरायचे नाही
होईल आपला उध्दार एकत्रकुंटूंबात
भारीतले सुख लपलय त्यात...
कवी-भटू हरचंद जगदेव जापीकर....




0 Comments: