दिवाळीत रंगली काव्यमैफिल
काल दिनांक 15/11/2020 रोजी साहित्य जागर मंच आयोजित ऑनलाईन कविसंमेलन उत्साहात पार पडले
कविसंमेलनाची सुरुवात आयोजक प्रदीप कासुर्डे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून त्यांची मातीचे ओवी ही काव्यरचना सादर करण्यात आली.
यानंतर उपस्थित कवींनी आपला परिचय करून दिला.या कविसंमेलनात जेष्ठ कवी, नवोदित कवी , विद्यार्थी , पत्रकार , लेखक, शिक्षक असे विविध समाजघटकातील कवी उपस्थित होते. यानंतर जीवन, बेरोजगारी , पर्यावरण , मुलगी वाचवा , शिक्षकाचे जीवनातील महत्व,चाचा नेहरू,घे भरारी सकारात्मकता , आई , पाणी , भान, छत्रपती शिवाजी महाराज, महिला अत्याचार,वेश्यावस्तील जीवन, इ. विविध
विषयावरील कविता सादर झाल्या.कविसंमेलनात डॉ.मारुती नलावडे,राजू गडहिरे, राजू राजपूत,कवी कांतासूत,आकाश पाटोळे, प्रथमेश भामरे, दिव्या पाटील, अक्षता नाईक,किर्ती बुटानी ,कवी सहभागी होते.शेवटी ई प्रमाणपत्रांचे वाटप करून किर्ती बुटानी यांनी सुंदररित्या आयोजक, सर्व कवी यांचे आभार मानले.अशाप्रकारे ऐन दिवाळीत ही शब्द मैफिल स्नेहाचा, विचारांचा, धागा जोडून गेली.





धन्यवाद
ReplyDelete