नगर मनमाड रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा,
(रस्त्यात खडे की खड्डयात रस्ते प्रवाशी अचंबीत)
नेहमीच्या पावसाळयापेक्ष्या चालू वर्षी वरून राजाने चांगलीच साथ दिली आहे, मात्र, या भयानक पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत,,याकडे मात्र संबंधित खात्याचे लक्स नसावे ही मात्र अतिशय दुर्दैवाची व खेदाची गोष्टआहे, प्रवासी कोणत्या ना कोणत्या कामासाठी , आपल्या चिलीपिल्यांच्या उदरनिर्वाहासाठी घराच्या बाहेर रस्त्यावर पडत असतो ,परंतु या रस्त्यावरील जीवघेण्या राक्षस रुपी खड्यातील यमदूतामुळे घराबाहेर पडलेला प्रवाशी परत सुखरूप परतेल याची खात्री मात्र बाळगतायेत नाही, मग हा खड्यातील जीवघेणा राक्षस गरीब -श्रीमंत असा भेद करीत नाही,त्याच्या समोर सर्व सामान असतात, थोडकयात--"सौंसार केला कोट्या न कोटी, मात्र मेल्यावर संग येईना लंगोटी,"अशी अवस्था मात्र प्रवाश्याची होत आहे,
आज पर्यंत नगर मनमाड रस्त्यावरील खड्या रुपी यमदूताने अनेक नि:शाप जीवांचे बळी घेतले आहेत, तरी देखील संबंधित खात्याने या बाबी गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही,, अजून किती नि:शाप जीवांचे बळी घेण्याचे वाट संबंधित खाते बघत आहे, कोण जाणे, कारण कधी का होईना हे खड्डे बुजवण्याचे काम तर करावे लागणारच आहे, मग मुहूर्त कोठे व कधी सापडणार आहे, थोडक्यात "ताकाला जाऊन गाडगे लपवून काय उपयोग" म्हणून संबंधित खात्याने त्वरित या नगर मनमाड महामार्गावरील खडे बुजवून प्रावश्यना जीवदान देऊन आशीर्वाद घ्यावेत ,अशी चरच्या सध्या प्रवाशी वर्गात जोरदार चालू असल्याचे समजते , मात्र ,सध्या काही अंशी खडे बुजवण्याचा हा जो प्रकल्प बांधकाम खात्याने हाती घेतला आहे, तो म्हणजे लहान मुलांची समजूत काढल्या सारखे आहे, कारण ही चललेली डागडुजी निष्काम आहे, थोडक्यात "पुढचा बुजवला की मागचा उखडला "असी अवस्था पहावयास मिळत आहे, , म्हनुन बांधकाम विभागाने समजूत न काढता जे करायचे आहे ते काळजी पूर्वक व दीर्घकाळ केलेले काम टिकेल या पद्धधीने खडे बुजवून प्रवाश्यांचें जीव वाचवावे अशी मागणी करण्यात येत आहे,






0 Comments: