कोरोना संकटात डोंबिवलीतील काही मुजोर रिक्षाचालकांकडून प्रवाश्यांची लुट सुरु
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात सर्व दैनदिन जीवन बंद झाल्याने आर्थिक फटका बसला होता.राज्य सरकारने काही नियमांच्या अटीवर अनलॉक करून हळूहळू जनजीवन सुरळीत आणत आहेत.यानंतर सर्वांनी एकमेकांना मदत केली असली तरी काही मजूर रिक्षाचालकांनी नियमांना धाब्यावर बसवून प्रवाश्यांची लुट करण्यास सुरुवात केली आहे.रिक्षा युनियन आणि प्रोटेस्ट अगेस्ट आॅॅटोवाला संघटनेने अश्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी भूमिका घेतली आहे.मात तरीहि लुट सुरूच असल्याने प्रवाश्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डोंबिवलीची वाढती लोकसंख्या आणि प्रवाश्यांच्या मागणीचा विचार करून रिक्षाचालकांनी प्रत्येक प्रवाशी वर्गासाठी दर ठरविले आहेत.तरीही मनमानी दर आकारण्याच्या दादागिरीवर अश्या मुजोर रिक्षाचालकांवर थोड्याप्रमाणात दंडात्मक कारवाई होते. कोरोना काळात मार्च महिन्यापासून रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नियमांचे पालन करण्याच्या अटीवर रिक्षा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. एका रिक्षात दोन प्रवासी व प्रत्येक प्रवाश्याकडून नियमाप्रमाणे दर आकारले आहेत. प्रामाणिक रिक्षाचालक या नियमांचे पालन करत असले तरी काही मुजोर रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करत रिक्षात तीन ते चार प्रवासी वाहतूक करत असून जादा पैसे घेत असल्याची तक्रारी वाढत आहेत.अश्या रिक्षाचालकांची दादागिरी वाढ असल्याने प्रवासी वर्गात संताप व्यक्त होत आहे.डोंबिवलीत ९ रिक्षा युनियन असूनही युनियनमधीलहि काही रिक्षाचालक रिक्षा युनियनचे ऐकत नसल्याने अश्या रिक्षाचालकांवर युनियन काय कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.तर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे डोंबिवली शहराकडे लक्ष देत नसल्याचे दिसते.तर पोलीस बळ कमी पडत असल्याने नियमाचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांनावर वाहतूक पोलीस प्रत्येक वेळी कारवाई करत नसल्याची ओरड सुरु आहे.वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे अश्या रिक्षाचालकांवर कारवाई केल्यास प्रवाश्यांना लुट थांबेल अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.
प्रतिक्रिया:-
कोरोना काळात सर्वाना आर्थिक फटका बसला आहे.मग तो रिक्षाचालक असो कि पनागरिक असो.. यासाठी सर्वानी एकमेकांना साथ देणे आवश्यक आहे.सर्वच रिक्षाचालक प्रवाश्यांची लुट करतात असे नाही. परंतु काही रिक्षाचालक आपले मनमानी प्रवासी भाडे आकारत असतात. अश्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली पाहिजे.
स्वाती मोहिते ( डोंबिवलीकर )
------------------------------
राज्य सरकारच्या निर्देशानुसार वाहतुकीबाबत दर आणि प्रवासी संख्या यावर दर ठरले आहेत. परंतु रिक्षात दोन पेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसल्यास त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अटी-शर्तीनुसार प्रवासी संख्या ठरविण्यात आली आहे.मात्र डोंबिवलीतील जे रिक्षाचालक दोन पेक्षा जास्त प्रवासी बसवून जादा भाडे आकारत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
प्रोटेस्ट अगेस्ट आॅॅटोवाला सदस्य - सागर गोर




सर्वच रिक्षावाले नियमांचे उल्लंघन करीत नाहीत, परंतु, जे रिक्षावाले नियमांचे उल्लंघन करतांना आढळतील अशा रिक्षावाल्यांबाबत नागरिकांनी सातत्याने संबंधितांकडे तक्रारी केल्या पाहिजेत आणि अशा तक्रार करणाऱ्यांची नांवे गुप्त ठेवण्याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. तरच लोक तक्रारी करण्यास पुढे येतील, कारण लोकांना रोज ये जा करावी लागते. त्यामुळे लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे वाटते.
ReplyDeleteप्राप्त तक्रारी नुसार अशा रिक्षावाल्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, प्रसंगी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांचे लायसन सहा महीन्यासाठी रद्द करण्यात यावे. लायसन रद्द केलेल्या रिक्षावाल्यांना त्यांनी पुन्हा असा गुन्हा केल्यास, कायमस्वरुपी लायसन व परवाना रद्द करुन त्यांचे नाव ब्लॅक लिस्ट वर ठेवले या अटी अधीन राहून, मुदत पुर्व लायसन पुनर्जीवित करुन रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी. हे करण्यास गरज पडली तर नियमांमध्ये तशी तरतूद करण्याची युद्ध पातळीवर कार्यवाही करण्यात यावी. असे केल्याशिवाय त्यांच्यात लक्षणीय फरक पडणे दुरापास्त होईल, असे वाटते.