कविता : गुन्हा
(माणूस वेसनाच्या आहारी जाऊन एक प्रकारे गुन्हा च करतो,
म्हणून कवितेला नाव दिले आहे - गुन्हा )
अरे अरे मानसा व्यसनाधीन होऊ नकोस
आपल्याच हाताने पायावर धोंडा पाडू नकोस
व्यसन करण्यात नाहीं रे मानवा मजा
ही तर आपल्या देहास, मरणाची सजा
व्यसनांपासून तू नेहमीच राहा दूर
तरच संसारात राहील आनंदाचा सूर
जीवन आपुले आहे अनमोल
व्यसनाने तुला केले रे गोलगोल
जीवघेण्या व्यसनांना दडपून टाकू
आता नको गुन्हा, आयुष्याचे सोनं करू
प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे (एम,ए ,बी ,एड)
राहता-(साकुरी) अहमदनगर





0 Comments: